शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अनुभवला मानव उत्क्रांतीचा इतिहास, भारतीय प्रागैतिहासिक वैभवावर विद्यापीठात प्रदर्शनी

By जितेंद्र ढवळे | Updated: January 6, 2024 16:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतीय प्रागैतिहासिक वैभवावर दोन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतीय प्रागैतिहासिक वैभवावर दोन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. मानव उत्क्रांतीचा इतिहास या प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला. विद्यापीठाचा प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभाग आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपूर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शनीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी पेंच वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभाग डॉ. प्रबास साहू, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नागपूरचे पुरातत्त्वविद अरुण मलिक, सहायक पुरातत्त्वविद शरद गोस्वामी, भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण विभागाचे संचालक निलांजन खटुआ, सहसंचालक राजकिशोर मोहतो यांची उपस्थिती होती.मानवाच्या निर्मिती ते उत्क्रांती विकास प्रक्रियेतील चार्ट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता. मानवाने उत्क्रांतीदरम्यान उपयोग केलेले विविध उपकरण चार्टच्या माध्यमातून दाखविण्यात आले. पाषाणकालीन, मध्य पाषाण, नव पाषाण या तीनही युगातील विविध वस्तू प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनीमध्ये संपूर्ण भारतातील शिल्प चित्रकला प्रदर्शित करण्यात आली. पाषाणकाला नंतरची शैल चित्रकला विद्यार्थ्यांना आकर्षित करीत होती. सोबतच भंडारा जिल्ह्यातील बावनथडी, चंद्रपूर जिल्ह्यातील नगर गोटा, अमरावती जिल्ह्यातील गाविलगड इत्यादी विविध ठिकाणातील शैल चित्रकला या प्रदर्शनीचे आकर्षण ठरले होते. प्रदर्शनीच्या निमित्ताने विभागातील विद्यार्थ्यांनी स्वतःहून पाषाणकालीन झोपडीचे निर्माण केले होते. ही झोपडी येणाऱ्या सर्वांचे लक्ष आकर्षित करीत होती. सोबतच या निमित्ताने विभागातील पुरातत्त्व अवशेषाचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर