शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

अमरावतीच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना नरकयातना

By admin | Updated: December 22, 2014 00:43 IST

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळव्दारा संचालित श्रीरामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेत असुविधांनी कळस गाठला असून विद्यार्थी नरकयातना भोगत आहेत. गत आठवडाभरापासून शिवराम श्रावण धुर्वे या

अमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळव्दारा संचालित श्रीरामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेत असुविधांनी कळस गाठला असून विद्यार्थी नरकयातना भोगत आहेत. गत आठवडाभरापासून शिवराम श्रावण धुर्वे या विद्यार्थ्याला गंभीर त्वचारोगाने ग्रासले असून याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आदिवासी विकास विभागाकडे दिली आहे. हव्याप्र मंडळाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळू नयेत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेला अनुदान मिळत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नसतील तर हा प्रकार संस्थेच्या नावलौकिकास धक्का पोहोचविणारा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत ठिकठिकाणी घाण, केरकचरा पसरल्याची तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. आश्रमशाळेतील वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना मारहाण करतात. आश्रमशाळेत एक ना अनेक समस्या उद्भवल्या असताना संस्थाचालकांचे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, फराळ मिळणे अपेक्षित आहे; तथापि रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेत शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी एकच वेळ जेवण मिळत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दुपारचे जेवण मिळत नसल्याने भूक लागल्यास मेसमध्ये जाऊन खाद्यपदार्थांची चोरी करीत असल्याची कबुली देत शिवराम धुर्वे या विद्यार्थ्याने सत्य विषद केले. (प्रतिनिधी)शिवरामच्या शरीरावर डागआदिवासी आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या शिवराम धुर्वे याच्या शरीरावर चर्मरोगामुळे डाग निर्माण झाले आहे. त्याच्या गुप्तांगावरही मोठ्या प्रमाणात जखमा असून त्याला खाजेचा आजारही झाला आहे. थातुरमातूर औषधोपचारानंतरही हे डाग दरदिवसाला वाढतच आहेत.चर्मरोगाने ग्रासल्याने अन्य विद्यार्थी जवळ करीत नाही, असेदेखील त्याने सांगितले.