शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अरबी भाषा शिकविणाऱ्या शिक्षकाच्या वासनेची विद्यार्थिनी शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:22 IST

Nagpur News विद्यार्थ्यांना अरबी भाषा शिकविणाऱ्या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून करीत होता शोषणमानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : विद्यार्थ्यांना अरबी भाषा शिकविणाऱ्या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

रफिक खान ऊर्फ मौलाना हाफिज साहब (२७) असे आरोपीचे नाव आहे. १७ वर्षांची पीडित विद्यार्थिनी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील घरीच राहतात, तर आई आणि दोन भाऊ मजुरी करतात. आरोपी रफिक खानची विद्यार्थिनीच्या कुटुंबासोबत जुनी ओळख आहे. तो विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना राशन देतो. त्यामुळे विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय त्याला सन्मान देतात. रफिक विद्यार्थ्यांना अरबी भाषा शिकवितो. रफिकने अल्पवयीन असलेल्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखविले. तो ६ मार्च २०२१ रोजी तिच्याशी लपून साक्षगंध करीत होता. त्याची माहिती मिळाल्यामुळे बालसुरक्षा अधिकाऱ्यांनी धाड टाकून साक्षगंध थांबविला. त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीला काटोल मार्गावरील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. २० दिवसांनंतर सुधारगृहातून आईवडिलांनी तिला घरी आणले. १३ एप्रिलला रफिकने तिला घरी बोलावले. तिचा टच स्क्रीन मोबाइल देऊन तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले. एका वर्षानंतर लग्न करू, असे सांगून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कौटुंबिक संबंध असल्यामुळे ती रफिकसाठी टिफिन घेऊन जात होती. दरम्यान, रफिकने तिच्याशी जबरदस्ती केली. तो त्याच्या ओळखीच्या महिलेच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध करू लागला. काही दिवसांपासून रफिक तिला त्रास देत होता. कोणाशीही बोलताना पाहून शंका घेऊन मारहाण करीत होता. तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत होता. त्रस्त होऊन अल्पवयीन विद्यार्थिनीने कुटुंबीयांना आपबिती सांगितली. मंगळवारी सामाजिक कार्यकर्ता सुनीता ठाकरे, हाफिज साबरी तसेच सकीना यांच्या मदतीने मानकापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, मारहाण, धमकी देणे आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीला केले गर्भवती

एमआयडीसीत अल्पवयीन विद्यार्थिनीला तिच्याच वयाच्या आरोपीने वासनेची शिकार बनविल्याची घटना घडली आहे. दोघेही शेजारी आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये दोघांची ओळख झाली. आरोपी १६ वर्षाच्या विद्यार्थिनीला मैत्रीच्या बहाण्याने घरी बोलवित होता. तिला प्रेम करीत असल्याची बतावणी करून मिहान परिसरात नेऊन शारीरिक संबंध करीत होता. ही बाब कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने अल्पवयीन मुलीला दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना शंका आली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर खरी माहिती उघड झाली. कुटुंबीयांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानी आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

.......................

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी