शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगार चक्क भिकाऱ्याच्या वेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 22:12 IST

भिकाऱ्याच्या वेशात दिवसभर रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले.

ठळक मुद्देदिवसा रेकी, रात्री घरफोडी : १० गुन्हे उघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिकाऱ्याच्या वेशात दिवसभर रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले. बबलू ऊर्फ डांगा राजाराम मोहनिया (वय ३२) आणि अभय धनराज देशपांडे (वय ३४) अशी या दोघांची नावे आहेत.दिवसभर हे दोघे वेगवेगळ्या भागात भिकाऱ्याचा वेश करून कुठे घरफोडी करायची ते ठरवत होते आणि रात्रीच्या वेळेस घरफोडी करून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करीत होते. गुरुवारी रात्री तहसील पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कुख्यात बबलू ऊर्फ डांगा संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ घरफोडीचे साहित्य आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण २ जूनला इतवारीतील जगदीश ट्रेडिंग कंपनीत घरफोडी केल्याचे सांगितले सोबतच अन्य दहा घरफोड्यांचीही कबुली दिली. हे गुन्हे जरीपटक्यातील आरोपी अभय देशपांडेच्या मदतीने केल्याचेही डांगाने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी देशपांडेलाही अटक केली. या दोघांकडून चोरलेल्या रकमेपैकी ११ हजार २०० रुपये तसेच वेगवेगळे साहित्य जप्त करण्यात आले.

टॅग्स :theftचोरीArrestअटक