शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची आंतरराज्य बससेवा सुरू; वाढले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 10:42 IST

पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरूकेले आहे. त्यानुसार आंतरराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचा या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरूकेले आहे. त्यानुसार आंतरराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचा या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने मालवाहतूक, खासगी गाड्यांचे टायर रिमोल्डिंग करणे सुरू केले. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरू केले आहे. त्यानुसार मध्य प्रदेशात गणेशपेठ आगारातून खमारपाणी येथे सकाळी ११.१५ वाजता, रंगारी येथे सकाळी ७.१५. ९ वाजता आणि दुपारी २ वाजता, बिछवा येथे सकाळी ८ वाजता, दुपारी ४.३० वाजता, पचमढी येथे ८.१५ वाजता, पांढुर्णाला सकाळी ७.१५ व ८.५० वाजता, छिंदवाडाला सकाळी ७.३० व ९ वाजता, मोहगावला सकाळी १०.३० वाजता, सायंकाळी ६ वाजता, पिंपळा (नारायणवार) सकाळी ८.४५ वाजता, लोधीखेडाला सकाळी ८.१५ वाजता, रामाकोनाला दुपारी १ वाजता, बेरडीला सकाळी ६.४५ वाजता, सायंकाळी ७.३० वाजता, लालबर्रा येथे सकाळी ७.५० वाजता बसेस सोडण्यात येतील.

तेलंगणा राज्यात हैदराबादला सकाळी ६ वाजता, सायंकाळी ७.३० वाजता, आदिलाबादला सकाळी ९ वाजता, दुपारी १.३० वाजता, मंचेरियलला दुपारी १२ वाजता, छत्तीसगडमध्ये रायपूरला दुपारी २ वाजता आणि राजनांदगावला सकाळी ७ वाजता बसेस सोडण्यात येणार आहेत. आंतरराज्यात बसेस सुरू केल्यामुळे एसटीचे प्रवासी वाढले असून एसटीला चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती गणेशपेठचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली.आंतरराज्य वाहतुकीला प्रतिसादपूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर प्रवाशांचा एसटीला प्रतिसाद लाभत आहे. आंतरराज्यात जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यासाठी एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरू केले आहे. या बसेसलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.

 

टॅग्स :state transportएसटी