काँग्रेसचे आश्वासन : गोळीबार चौकात पदयात्रा नागपूर : हलबा समाजाचे बरेचसे प्रश्न सुटले नाहीत. त्यांचे प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे. येत्या काळात त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याला काँग्रेसतर्फे प्राधान्य दिले जाईल, असे माजी मंत्री अनिस अहमद यांनी आश्वस्त केले. मध्य नागपुरातील गोळीबार चौकातून मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेपूर्वी एका छोटेखानी सभेला संबोधित करताना अनिस अहमद म्हणाले, भाजपने जनतेला दिलेली आश्वासने फोल ठरत आहे. भाजपच्या १०० दिवसाच्या कार्यकाळात महागाईवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला अपयश आले असून उलट महागाई चारपटीने वाढली आहे. पदयात्रा गांजाखेत, टिमकी या परिसरातून जात असताना, या परिसरातील विणकरांशी अनिस अहमद यांनी बातचित केली. जागनाथ बुधवारी येथील व्यापाऱ्यांशी व तीन नल चौकातील युवकांच्या तक्रारी, समस्या ऐकून घेतल्या. या रॅलीत डॉ. विठ्ठल कोंबाडे, कमलेश समर्थ, किशोर सिरपूरकर, स्मिता कुंभारे, पुष्पा निमजे, प्रभाकर खापरे, पुष्पा पौनीकर, वामन पौनीकर, छाया खापेकर, साधना मार्शल, राजू बोरकर, बालकदास हेडाऊ, राजू ताबूतवाले, वामनराव हेडाऊ, जयकिशन वाडेवाले, दिनेश पारेख, राहुल खापेकर, प्रशांत धार्मिक, कल्पना फुलबांधे, किशोर उमरेडकर, इफ्तेखार अन्सारी, जागेश्वर हेडाऊ, हिरामण मौंदेकर, हबीबभाई ट्रान्सपोर्टवाले, अनिल सुने, इफ्तेखार लिडर, नरेंद्र गौर, सतीश सोनी, देवानंद अंबागडे, दीनानाथ खरबीकर, उषा खरबीकर, विजया ताजने, संजय बिंड, पुष्पा निखारे, श्यामलाल आरमोरीकर, सुरेंद्र राय, नरेंद्र कुबाने, किशोर सिरपूरकर, भय्यालाल उईके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हलबांसाठी संघर्ष करणार
By admin | Updated: October 1, 2014 00:46 IST