शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अजनीतील हनी ट्रॅपशी जुळले आहेत सेक्स रॅकेटचे तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 20:58 IST

sex racket कुख्यात रोहित रामटेके याच्या इशाऱ्यावर हनी ट्रॅप करून अल्पवयीन मुलीकडून गँगरेप प्रकरण घडवून आणणारी युवती ही अल्पवयीन मुलींना देहव्यापारात ओढण्याचे काम करीत होती. वाठोडा ठाणेअंतर्गत सापडलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याची तपासणी केल्यानंतर हा आश्यर्चजनक खुलासा उघडकीस आला आहे. यामुळे रामटेके टोळीसाठी काम करणाऱ्या युवतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढायच्या रामटेके टोळीच्या तरुणी वाठोडा पोलिसांच्या तपासात आश्चर्यजनक खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुख्यात रोहित रामटेके याच्या इशाऱ्यावर हनी ट्रॅप करून अल्पवयीन मुलीकडून गँगरेप प्रकरण घडवून आणणारी युवती ही अल्पवयीन मुलींना देहव्यापारात ओढण्याचे काम करीत होती. वाठोडा ठाणेअंतर्गत सापडलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याची तपासणी केल्यानंतर हा आश्यर्चजनक खुलासा उघडकीस आला आहे. यामुळे रामटेके टोळीसाठी काम करणाऱ्या युवतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

दीड महिन्यापूर्वी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अजनीत गँगरेप झाला होता. यात अमित लोखंडे, प्रशीक गोटे, दत्तू उर्फ खटीक दाभणे, आणि बिट्टू वाघमारे याला अटक करण्यात आली होती. लोकमतने हे सर्व प्रकरण एका योजनेंतर्गत घडवून आणण्यात आल्याचे उघडकीस आणले होते. पोलिसांनी तपास केल्यावर रोहित रामटेकेने एका युवतीच्या माध्यमातून हनी ट्रॅप अंतर्गत हा प्रकर घडवून आणला असल्याचे उघडकीस आले होते. या आधारावर पोलिसांनी भा.दं.वि. कलम १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून रोहित रामटेकेला अटक केली. तेव्हापासून संबंधित युवती फरार झाली. तिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित तरुणीचे अपहरण केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या एसएसबीने १७ मे रोजी वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतील मोतीलालनगर येथे धाड टाकून अर्चना शेखर वैसंपायन नावाच्या महिलेला देह व्यापाराचा अड्डा चालविताना पकडले. अर्चनाच्या अड्ड्यावर तीन अल्पवयीनसह एक युवतीही सापडली. अर्चना पूर्वी अजनीत भाजीपाल्याचा ठेला लावायची. नंतर ती या धद्यात उतरली. अल्पवयीन मुलींना विचारपूस करताना अजनीतील हनी ट्रॅप प्रकरणातील युवती यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. अजनीत भाजीपाला विकताना अर्चना त्या युवतीच्या संपर्कात आली. तिच्या मदतीने अर्चना देहव्यापाराचा अड्डा चालवू लागली. रामटेके टाेळीची सदस्य असलेली ती युवतीच अर्चनाला अल्पवयीन मुली उपलब्ध करून द्यायची. ती युवती अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यात माहीर आहे. ती पैशांचे आमिष दाखवून मुलींना देहव्यापारासाठी तयार करते. या मोबदल्यात अर्चना तिला कमिशन देते. पैशासाठीच तिने रामटेके टोळीच्या इशाऱ्यावर अल्पवयीन मुलीचा वाापर करून हनी ट्रॅप घडवून आणला. यात अनेकजण सामील आहेत. या दिशेने सखोल चौकशी झाल्यास अनेक आश्चर्यजनक खुलासे उघडकीस येतील.

१५ मिनिटाच्या अंतराने ती बचावली

एसएसबीच्याची कारवाई केली त्याच्या १५ मिनिटापूर्वीच ती युवती त्या अड्ड्यावरून निघाली होती. त्यामुळे ती रंगेहात पकडण्यापासून वाचली. अजनी पोलिसही आता तिच्या शोधात आहेत.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटnagpurनागपूर