शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ओला इलेक्ट्रीक कारचालकांचा संप चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:12 IST

शहरातील ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक कारचालकांनी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कंपनीच्या कस्टमर अ‍ॅपवर इलेक्ट्रीक गाड्यांचा समावेश नसल्याने गाड्यांना बुकिं ग मिळत नसून चालकांना गाड्या चालविणे परवडेनासे झाल्याचा आरोप कारचालकांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला. दरम्यान कंपनी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक कारचालकांनी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कंपनीच्या कस्टमर अ‍ॅपवर इलेक्ट्रीक गाड्यांचा समावेश नसल्याने गाड्यांना बुकिंग मिळत नसून चालकांना गाड्या चालविणे परवडेनासे झाल्याचा आरोप कारचालकांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला. दरम्यान कंपनी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.इलेक्ट्रीक कारचालकांच्या प्रतिनिधी म्हणून एकमेव महिला कारचालक निर्मला पोर्ट यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. शहरात गेल्या अडीच वर्षापासून इलेक्ट्रीक कार सुरू आहेत. पूर्वी २५० कारचालक होते, आता केवळ ९० शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅपवर नसल्याने कारचालकांना बुकिंग मिळत नाही. दुसरीकडे कारसाठी दररोजचे भाडे १००० रुपये व दोनदा बॅटरी चॉर्जिंगचे ७०० रुपये असे १७०० रुपये खर्च करावेच लागतात. मात्र बुकिंग मिळत नसल्याने दिवसातून कशीबशी १०००-१२०० रुपये कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या चारपाच महिन्यांपासून चालक प्रचंड तणावात असल्याचे त्या म्हणाल्या. इलेक्ट्रीक कार कस्टमर अ‍ॅपवर टाकून बुकिंग स्लॉट वाढविण्यात यावा, गाडीचे भाडे ५०० रुपये करण्यात यावे, आरएमटीमध्ये गाडी उभी केल्यास दंड लावू नये, गाडी मेंटेनन्सवर लक्ष द्यावे आणि चालकांना महिन्याला ४ सुट्या द्याव्या, आदी मागण्यांचे निवेदन चालकांनी कंपनी व्यवस्थापकांना सादर केले आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप चालकांनी केला. पत्रपरिषदेत सत्यशील पानतावणे, प्रशांत बारसागडे, चैतन्य तायवाडे, राजेंद्र सिरसाट, राजू श्रीवास्तव, सुनील गुरव, उमेश पटले आदी उपस्थित होते.

टॅग्स :OlaओलाStrikeसंपElectric Carइलेक्ट्रिक कार