शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

नवनीत राणा यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 20:51 IST

Navneet Rana, election petitionमुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने खासदार नवनीत राणा यांचे मोची-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागपूर खंडपीठात प्रलंबित तीन निवडणूक याचिकांना बळ मिळाले आहे.

ठळक मुद्देवकिलांची प्रतिक्रिया : अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने खासदार नवनीत राणा यांचे मोची-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागपूर खंडपीठात प्रलंबित तीन निवडणूक याचिकांना बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. सचिन थोरात, अ‍ॅड. राघव कविमण्डन व ॲड. संदीप चोपडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. या निवडणूक याचिकांमध्ये राणा यांच्या अनुसूचित जातीच्या घोषणापत्रावरच आक्षेप घेण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राणा यांना ३० ऑगस्ट २०१३ रोजी मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांनी मोची-अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले होते तर, ३ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबई उपनगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र जारी केले होते. त्या आधारावर राणा यांनी अनुसूचित जातीकरिता आरक्षित अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढली व जिंकली. त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत अनुसूचित जातीचे घोषणापत्र सादर केले होते. त्या घोषणापत्रावर आक्षेप घेऊन शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ, शिवसेना कार्यकर्ते सुनील भालेराव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी राणा यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वेगवेगळ्या निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. राणा या पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. ही जात अनुसूचित जाती प्रवर्गात मोडत नसल्यामुळे त्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपात्र आहेत. करिता, त्यांची निवड रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

या याचिकाकर्त्यांच्या वतीने अनुक्रमे अ‍ॅड. थोरात, अ‍ॅड. कविमण्डन व ॲड. चोपडे न्यायालयात कामकाज पाहत आहेत. राणा या अनुसूचित जातीच्या नाहीत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्या आता अमरावती मतदारसंघाच्या खासदारपदी कायम राहू शकत नाही. राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा नाकारल्यास राणा यांना खासदारकी सोडावी लागेल, असे मतही सदर वकिलांनी व्यक्त केले.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाHigh Courtउच्च न्यायालय