शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सीताबर्डीत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ सर्वेक्षण : स्मार्ट सिटीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:59 IST

केद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयांतर्गत ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत नागपूर स्मार्ट अ‍ॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सीताबर्डी बाजारपेठेत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ चे सर्वेक्षणाला सोमवारी सुरुवात केली.

ठळक मुद्देव्हेईकल फ्री झोन निवडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयांतर्गत ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत नागपूर स्मार्ट अ‍ॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सीताबर्डी बाजारपेठेत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ चे सर्वेक्षणाला सोमवारी सुरुवात केली.स्ट्रीट फॉर पीपल पायलट प्रोजेक्टमध्ये निवड करण्यासाठी नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत सात दिवस सर्वेक्षण चालणार आहे. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सीताबर्डी बाजारपेठेतून याची सुरुवात केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक पराग पोटे उपस्थित होते.स्ट्रीट फॉर पीपल सर्वेक्षणादरम्यान महेश मोरोणे यांनी दुकानदारांची मते जाणून घेतली. सीताबर्डी बाजारपेठेत वाहनांचा प्रवेश प्रतिबंधित केला तर त्यांचा व्यवसायवर काय परिणाम होईल, सगळ्या प्रकारच्या वाहनांवर प्रतिबंध लावल्यास नागरिक बाजारपेठेत पायी चालू शकतील का ? नागरिकांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्य बाजारपेठेत व्हेईकल फ्री झोन केल्यामुळे हॉकर्सना देखील त्याचा फायदा होईल. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था दुसरीकडे केली जाईल, असे ही यावेळी सांगण्यात आले.सर्वेक्षणाला दुकानदार, हॉकर्स आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. स्ट्रीट फार पीपल केल्याने नागरिकांचा कल सीताबर्डी मार्केटकडे वाढेल आणि याचा लाभ सगळ्यांना होईल. वृध्द किंवा महिलांसाठी पायी फिरणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी ई-रिक्षाची व्यवस्था केली जाईल. तसेच युवा वर्ग या सायकलचा लाभ घेऊ शकतो. दुकानदारांना माल आणण्यासाठी रात्रीच्या वेळेत परवानगी दिली जाईल. सर्वेक्षणामध्ये एम चांडक कंपनी, खादी ग्रामोद्योग, हॉकर्स युनियनचे अध्यक्ष गोपीचंद आंभोरे आणि अन्य नागरिकांनी भाग घेतला.सूचना व अभिप्रायावर उपाययोजनासर्वेक्षण पुढील सात दिवस पर्यंत करण्यात येईल. याचा मुख्य उद्देश नागपूरात प्रदूषणविरहीत वाहनांना प्रोत्साहन देण्याचा आहे. नागरिकांची प्रतिक्रिया, सूचना व अभिप्राय लक्षात घेतल्यानंतर यावर पुढील उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूर