शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे ! उपराजधानीत मोकाट कुत्र्यांचा नऊ हजार लोकांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 10:14 IST

वाचून धक्का बसेल ! उपराजधानीत वर्षांला सरासरी ९ हजार नागरिकांना मोकाट कुत्री (श्वान) चावा घेतात.

ठळक मुद्देदिवसाकाठी २४ नागरिकांना बसतो फटका शहरात जवळपास ८० हजार श्वान

योगेंद्र शंभरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाचून धक्का बसेल ! उपराजधानीत वर्षांला सरासरी ९ हजार नागरिकांना मोकाट कुत्री (श्वान) चावा घेतात. दिवसाकाठी हे प्रमाण सरासरी २४ इतके असले तरी मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता उपराजधानीत भविष्यात मोठे संकट निर्माण होणार आहे.मनपा सूत्रानुसार, शहरात मागील तीन-चार वर्षाच्या आकडेवारीनुसार विविध परिसरात कुत्र्यांद्वारे नागरिकांना चावण्याचे प्रमाण दरवर्षी आठ ते नऊ हजारापर्यंत आहे.२०१७ मध्ये गणनेनुसार शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या ८० हजार नोंदविण्यात आली होती तर पाळीव कुत्र्यांची संख्या वेगळी आहे. उत्तर नागपूर, मध्य नागपुरातील मोमीनपुरा, वाडीतील दाभा, मानेवाडा-हुडकेश्वर आदी परिसरातील नागरिकांच्या मोकाट कुत्र्यांनी चावल्याच्या तक्रारी सर्वाधिक मिळताहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यांची वाढलेली संख्या नियंत्रित करण्यासाठी आवश्यक नसबंदी अभियान २०१६ पासून संथ पडले. यानंतर व्हेटरनरी कॉलेजला नसबंदीचे काम सोपविण्यात आले. परंतु एनजीओनेही दीड महिन्यानंतर काम बंद केले.मनपाने खूप प्रयत्न केल्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये भांडेवाडी आणि गिट्टीखदान परिसरातील अ‍ॅनिमल सेंटर सुरू करून नसबंदी करण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु गिट्टीखदान येथील शेल्टरला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे येथील सेंटर बंद करण्यात आले. आता मनपाने स्वत: भांडेवाडीतील शेल्टर हाऊसच्या सेंटरची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु या शेल्टरमध्ये जागा आणि मनुष्यबळाची कमतरता आहे. मनपाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, भांडेवाडीतील अ‍ॅनिमल्स शेल्टर होममध्ये मनपाने कॉन्ट्रॅक्टवर तीन व्हेटरनरी डॉक्टरांना नियुक्त केले आहे. तिथे जखमी आणि आजारी कुत्रांवर उपचारासह नसबंदी आॅपरेशनही केले जात आहे. सध्या सेंटरमध्ये दरविशी सहा ते सात कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. या कामला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.पावसात वाढेल त्रासपावसाच्या दिवसात पाऊस थांबताच मोकाट कुत्र्यांचे समूह रस्त्यावर बसून असतात. सर्वत्र पाणी साचून असल्याने चिखल झाल्याने वाहन चालक गाड्या सांभाळूनच चालवतात. या दिवसात कुत्र्यांची संख्याही वाढत असते. अशा वेळी वाहन चालकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.रात्रीला दुचाकी वाहनचालक होताहेत जखमीशहरात विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोकाट कुत्र् यांचे समूह राहत असल्याने दुचाकी वाहनचालकांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. गतीने वाहन नेले तर कुत्री अंगावर धावतात. गतीने वाहन नेले तर कुत्री अंगावर धावतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. कित्येकदा कुत्रे अंगावर आल्याने घाबरून जाऊनही अपघात घडले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य