शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

अजब चोरट्याची गजब कहानी.. थंडी वाजते म्हणून चक्क पेटवून दिली दीड लाखांची बाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 21:28 IST

Nagpur News कडाक्याच्या थंडीत आजुबाजूला सरपण नसल्यामुळे एका चोरट्याने चक्क दीड लाखांची बाईकच पेटवली. या धगधगत्या बाईकचा शेक घेत चोरट्याने थंडीला पळवून लावले.

ठळक मुद्देजबाब ऐकून पोलिसांनाच भरले

नागपूर - कडाक्याच्या थंडीत आजुबाजूला सरपण नसल्यामुळे एका चोरट्याने चक्क दीड लाखांची बाईकच पेटवली. या धगधगत्या बाईकचा शेक घेत चोरट्याने थंडीला पळवून लावले. अटक केल्यानंतर पोलिसांना त्याने मोटरसायकलची शेकोटी केल्याचे सांगितले. ते ऐकून पोलिसांनाच कापरे भरले.

घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा छडा लावून पोलिसांनी अहमद खान रशिद खान, शेरा उर्फ समीर अहमद जाकिर अहमद, करण किशोर यादव तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ९ दुचाकी जप्त केल्या. चोरीची एक दुचाकी घेऊन मोहम्मद सरफराज सुलतान अंसारी तसेच सय्यद आसिफ सय्यद निजाम दोघे पळून गेले. त्यातील सरफराज नामक चोरट्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

दुचाकी कुठे आहे, असा थेट प्रश्न पोलिसांनी केला. चोरट्याने शेतात असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला घेऊन पोलीस शेतात पोहचले. तेथे दुचाकीचा नुसता सांगाडा होता. ती पुर्णता जळाली होती. ती कशी जळाली, असा प्रश्न येताच चोरट्याने उत्तर दिले. त्या उत्तराने काही पोलिसांना कापरे भरले तर काहींना घाम फुटला. फरार झाल्यानंतर आसिफ पळून गेला. आपण पोलिसांच्या धाकाने दुचाकी घेऊन शेतात लपलो. रात्र वाढली तसा गारठाही वाढला. आजुबाजुला शेकोटी करण्यासाठी काहीच नव्हते. त्यामुळे दुचाकीच्या पेट्रोल टाकीला फोडून दुचाकीच पेटवून दिली. धगधगत्या दुचाकीच्या शेकोटीसमोर बसून आपण कडकडती थंडी पळवून लावली, असेही त्याने पोलिसांना सांगितले. दीड लाखाच्या बाईकची या चोरट्याने शेकोटी केल्याचे ऐकून (पाहून) पोलिसांना काय करावे, हेच सूचेनासे झाले आहे.

आसिफची कैफियत व्हायरल

या टोळीतील पाचवा फरार आरोपी आसिफ याने पोलिसांच्या धाकामुळे जीवन कसे निरर्थक झाले, त्याची कैफियत मांडणारा व्हिडीओ बनविला. ‘ये देखो मेरा लाईफ... क्या जिंदगी बन गयी है’ असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला होता. लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीला शुक्रवारी ती बातमी प्रकाशित झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आसिफचा शोध सुरू असून, त्याला आम्ही लवकरच अटक करू, असा विश्वास ठाणेदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

-----

टॅग्स :Jara hatkeजरा हटके