नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी क्रांती दिनापासून सुरू झालेल्या आंदोलनाची स्वातंत्र्यदिनी सांगता झाली. यात आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला असून २६ ऑगस्टला विदर्भात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्याचा तसेच केंद्रावर दडपण आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीजबिल माफीच्या मुद्द्यावर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना गावबंदी करण्यासह अनेक निर्णय घेण्यात आले. स्वातंत्र्याचा ७५ वा वाढदिवस होत असताना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इतवारी येथील शाहिद चौकातील ठिय्या आंदोलनात एक दिवसाचे उपोषण केले. आंदोलन समितीचे नेते ॲड. वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता विदर्भातील कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला. दुपारी झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची रूपरेषा ठरली. राम नेवले यांनी ठराव मांडले.
२६ ऑगस्टला विदर्भात रास्ता रोको, जेल भरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST