शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

अंबाझरी तलावाचे दूषितीकरण थांबवा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:04 IST

शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या अंबाझरी तलावाचे दूषितीकरण थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विविध आदेश दिले.

ठळक मुद्देसांडपाणी मिसळत असल्यामुळे मासे मरताहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या अंबाझरी तलावाचे दूषितीकरण थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विविध आदेश दिले.हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळते. तसेच, तलावामध्ये पाणकांदा ही वनस्पती झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत असून जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळू नये याकरिता आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश वाडी नगर परिषदेला दिले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तांत्रिक मान्यता गरजेची असते. त्यामुळे या प्रकरणात प्राधिकरणला प्रतिवादी करण्यात आले व त्यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले. हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी अंबाझरी तलावात सोडले जाते का याची शहानिशा करून तीन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश महापालिकेला देण्यात आला. तसेच, पाणकांदा वनस्पती अधिक प्रमाणात पसरू नये याकरिता तातडीने कारवाई करण्यात यावी आणि पाणी साठवणुकीची क्षमता वाढावी याकरिता तलावाचे खोलीकरण करण्यावर विचार करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. नागपुरातील वैशिष्ट्यांमध्ये अंबाझरी तलावाचा समावेश होतो. हा तलाव आपल्या सौंदर्यामुळे सर्वत्र लोकप्रिय आहे. तसेच, या परिसरात उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकामुळे हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाले आहे. परंतु, गेल्या महिन्यात अचानक तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले. तलावाच्या काठावर मृत माशांचा ढीग साचला. दरम्यान, हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी माशांच्या मृत्यूकरिता कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणमित्रांनी केला होता. तसेच, शहरातील वृत्तपत्रांनी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने स्वत:हून ही याचिका दाखल करून घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल तर, महापालिकेच्यावतीने अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmbazari Lakeअंबाझरी तलावpollutionप्रदूषण