शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

योग्य नियोजन होईपर्यंत नवीन सिमेंट रोड बांधणे थांबवा

By निशांत वानखेडे | Updated: July 24, 2024 19:11 IST

जनमंचकडून कळकळीची मागणी : प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागपूरकरांचे हाल

‘लाेकमत’ वृत्तमालिकेची दखलनागपूर : २० जुलै राेजी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडाली. एका दिवसाच्या अतिवृष्टीने शेकडाे वस्त्या जलमय केल्या. चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या सिमेंट रस्त्यांमुळेच शहराची ही दैनावस्था झाली, अशी टीका जनमंचने केली आहे. त्यामुळे यापुढे याेग्य नियाेजन हाेईपर्यंत नवीन सिमेंट राेड बांधणे  थांबवा, अशी कळकळीची मागणी जनमंचने केली आहे.

गेल्या वर्षी २३ सप्टेंबर आणि यंदा २० जुलै राेजी नागपूरकरांनी पुराचा हाहाकार अनुभवला. अवघ्या ७ तासात २३२ मि.मी. पावसाची नाेंद झाली आणि या अतिवृष्टीमुळे अवघे शहर जलमय झाल्याचे दिसून आले. जवळच्याच नाही तर शहरातील पाॅश वस्त्यांनाही हा तडाखा बसला. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या पुरस्थितीत जवळपास १० हजार घरांचे नुकसान झाले व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कित्येकांचे संसार उघड्यावर आले. हा आकडा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.

‘लाेकमत’ने पावसात केलेले सर्वेक्षणात अयोग्य पद्धतीने बांधलेल्या सिमेंट राेडमुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचे अधाेरेखित केले हाेते. जनमंचनेही या गाेष्टीची दखल घेतली. जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले, चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या सिमेंट राेडमुळेच नागपूरची अशी दैनावस्था झाली आहे. पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसणे, तसेच आजूबाजूच्या घरांपेक्षा रोडची उंची जास्त झाल्याने लाेकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब सामान्य लाेकांना समजत असताना गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर सुधार प्रन्यास सारख्या शासकीय यंत्रणांना हे समजले नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांची जबाबदारी झटकून मुसळधार पावसालाच जबाबदार धरले जाते, हे दुर्देव हाेय. 

रस्त्याची उंची आजूबाजूच्या घरांपेक्षा जास्त नसावी, तसेच पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था असावी. अशी व्यवस्था हाेईपर्यंत सिमेंट रोडची नवीन कामे थांबवण्याची मागणी जनमंचने पत्रकाद्वारे केली. या निवेदनात महासचिव विठ्ठलराव जावळकर, उपाध्यक्ष मनोहर रडके, खरसने, शरद पाटील, रमेश बोरकुटे, दादा झोडे, शिंदे, कोरडे, रामेकर, देवळे, भुसे, सावलकर, पांडे, राम आखरे, टी बी जगताप, निनावे, उत्तम सुळके, मिलिंद राऊत यांचा समावेश आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर