शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर’च्या रक्तपेढीतून रक्त देणे बंद!

By admin | Updated: August 29, 2015 03:09 IST

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोज १२वर किचकट शस्त्रक्रिया होऊन १५वर रक्ताच्या पिशव्या लागतात.

रुग्णांच्या जीवाशी खेळ : मेडिकलने नेलेले ‘एलयाजा’ यंत्र दिलेच नाही सुमेध वाघमारे नागपूरसुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोज १२वर किचकट शस्त्रक्रिया होऊन १५वर रक्ताच्या पिशव्या लागतात. असे असतानाही ‘सुपर’च्या रक्तपेढीतील एकमेव ‘एलयाजा रिडर’ मेडिकल घेऊन गेले. धक्कादायक म्हणजे, हे यंत्र आठवडा होऊनही परत दिले नाही. यामुळे गुरुवारपासून रक्तपेढीतून रक्त देणे बंद झाले आहे. इतर रक्तपेढीतून उधारीवर रक्तपिशव्यांचा पुरवठा करण्याची वेळ या रक्तपेढीवर ओढावली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास आवश्यक असणाऱ्या रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागू नये, म्हणून मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्तपेढीची सोय करण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातू रुग्ण येतात. रोज दोन न्यूरो सर्जरी, दोन बायपास सर्जरी, सहावर अ‍ॅन्जिओग्राफी, दहा डायलिसीस होतात. याशिवाय इतरही विभागात गंभीर स्वरुपाचे रुग्ण भरती असतात. यामुळे १५वर रक्तपिशव्यांची गरज भासते. डागातून मागवावे लागते रक्तनागपूर : रक्तदात्याने रक्त दिल्यानंतर ते साठवून ठेवण्याअगोदर काही चाचण्या करण्यात येतात. एचआयव्ही-१, एचआयव्ही-२, हेपिटायिटस - बी, हेपिटायिटस-सी, गुप्तरोग आणि मलेरिया या चाचण्या करून रक्तात रोगजंतू नसल्याची खात्री केली जाते. या चाचण्या ‘एलायजा रिडर’ यंत्रावर करण्यात येतात. यामुळे रक्तपेढीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे यंत्र असते. परंतु मेडिकलने हे यंत्रच घेऊन गेल्याने रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे बोलले जात आहे. सूत्राने सांगितले की, सुपरच्या रक्तपेढीत जमा करून ठेवण्यात आलेल्या रक्ताच्या पिशव्या संपायला आल्या आहेत. अनेक रक्त गटाच्या पिशव्या उपलब्ध नाही. गुरुवारी एका रुग्णाला ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज पडली असताना त्याला मेडिकलमध्ये पाठविण्यात आले, परंतु येथे चक्क नाही म्हटल्यावर डागा रुग्णालयातून पाच रक्तपिशव्या मागविण्यात आल्या. शुक्रवारीही अशीच वेळ एका रुग्णावर आल्याची माहिती आहे.रक्तसंक्रमण अधिकारीही एकच४सुपरच्या रक्तपेढीत यंत्रासोबतच अपुरे मनुष्यबळ आहे. रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असताना दोन भरण्यात आली आहे. यातीलही एका अधिकाऱ्याची बदली मेयोत करण्यात आली. त्याच्या जागेवर अद्यापही कोणीच आलेले नाही. यामुळे एकच रक्तसंक्रमण अधिकारी आहे. ‘ब्लड कॉम्पोनन्ट सेपरेटर’ मशीनही नाही ४सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोजच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होतात. यामुळे रक्त व रक्तघटकाची उपलब्धता महत्त्वाची ठरते. परंतु रक्तपेढीत रक्तघटक वेगळे करणारी ‘ब्लड कॉम्पोनन्ट सेपरेटर’ मशीनच नाही. यामुळे रुग्णाला ‘होल ब्लड’ दिले जाते. ज्यांना ‘कॉम्पोनन्ट ब्लड’ची गरज असते, त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.