शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सडक्या सुपारीचा गोरखधंदा बंद करा; पोलीस आयुक्तांची रोखठोक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 21:53 IST

Nagpur News आरोग्यास घातक असलेली सुपारी विकणारांचे हात कायद्याच्या आडकित्यात पकडले जाईल, असा रोखठोक ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.

ठळक मुद्देव्यापारी, तपास यंत्रणांसोबत संयुक्त बैठक

नागपूर - बाहेर देशातून आणलेली सडकी सुपारी विकून कुणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असेल तर पोलीस मुग गिळून बसणार नाही. आरोग्यास घातक असलेली सुपारी विकणारांचे हात कायद्याच्या आडकित्यात पकडले जाईल, असा रोखठोक ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला. प्रारंभी त्यांनी सुपारी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ, एफडीए, डीआरआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची संयूक्त बैठक घेतली. त्यात सुपारीच्या नावावर केली जाणारी सडक्या सुपारीची तस्करी आणि कारवाईच्या संबंधाने प्रदीर्घ चर्चा झाली.

चार दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने सलग दोन दिवस छापेमारी करून पारडी तसेच लकडगंजमध्ये मोराणीपूर ट्रान्सपोर्टचे अनुप नगरिया आणि राजेश पहूजाच्या ताब्यातील साडेपाच कोटींची सुपारी जप्त केली. त्यांची गोदाम सील करून या दोन्ही गुन्ह्यात अनुपकुमार नगरिया (४५, सूर्यनगर), गब्बरसिंग रणजीतसिंग लोधी (२५, बंदरी मालढम, सागर, मध्य प्रदेश), अमित ग्यानचंद थारवानी आणि सुरेश रामप्रसाद सोनकुसरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी ही कारवाई करतानाच ईडी, डीआरआयलाही कारवाईबाबत माहिती देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे सुपारी तस्करांचे धाबे दणाणले. पोलीस आणि सुपारी तस्करांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या काही दलालांनी पोलिसांवर दडपण आणण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिण्याच्या सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर, सुपारी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटले. ही कारवाई चुकीची असल्याचे सांगून वसुलीसाठी सुपारी व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी ते ऐकून घेतल्यानंतर व्यापारी, एफडीए, डीआरआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची संयूक्त बैठक घेतली. चांगल्या प्रतिच्या सुपारीच्या व्यवसायाला पोलिसांचा त्रास होणार नाही. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सडक्या सुपारीच्या तस्करांचा गोरखधंदा यापुढे चालणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना अमितेशकुमार यांनी सडकी सुपारी, तस्करी आणि पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.

श्रीलंका, इंडोनेशिया सारख्या देशातील सडलेली सुपारी उचलुन आणून सुपारी तस्कर भट्टी लावतात. गंधक आणि ईतर घातक रसायने टाकून ही सुपारी टणक तसेच शुभ्र बनिवली जाते. त्यानंतर खर्रा, सुगंधीत सुपारी, पान मसाला मध्ये ती विकली जाते. या सुपारीने अनेकांना वेगवेगळी व्याधी होते. रोग जडतात. अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळतानाच सुपारी तस्कर शासनाचा कोट्यवधींचा करही बुडवितात.दुसऱ्याच नावाने सुपारी बोलविली जाते. कारवाईसाठी आलेल्यांना दुसरेच कागदपत्रे दाखवली जातात. हे संपूर्ण गैरप्रकार यापुढे चालणार नाही, असे आपण सुपारी व्यापाऱ्यांना सांगितल्याचेही आयुक्त म्हणाले.

१४ दिवसांत द्या अहवालपोलीस वेळोवेळी कारवाई करून एफडीएला बोलवितात. एफडीएचे अधिकारी नमूने जप्त करतात. नंतर मात्र काय होते, ते कळतच नाही. या संबंधाने प्रश्न उपस्थित केला असता, यापुढे कारवाईचे नमूने एफडीए आणि डीआरआयला दिली जाईल. या दोन्ही यंत्रणा दर्जा आणि कागदपत्रे तपासतील. त्यांनी १४ दिवसांत आपला अहवाल द्यावा, असे सांगण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.‘लोकमत’कडून वेळोवेळी पर्दाफाशविशेष म्हणजे, ‘लोकमत’ने सुपारीचा गोरखधंदा आणि तस्करांच्या नेटवर्कचा वेळोवेळी पर्दाफाश केला आहे. टोपणनावाने वापरणारे राहुल, राजू अण्णा, टिनू, आनंद, पंचमतिया, अनिल, आसिफ कलिवाला, बंटी, गनी खान, जतीन-हितेश, कॅप्टन, मोर्या, हारू, रवी, संजय आनंद, पाटना, इर्शाद, गनी, चारमिनार, बंटी आणि संजय या सुपारी तस्करांची नावेही सोमवारच्या अंकात प्रकाशित केली. या पार्श्वभूमीवर, काही दलालांनी पोलीस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी रोखठोक भूमीका घेतल्याने सुपारी तस्करांचा डाव उलटा पडला आहे. त्यामुळे सुपारी तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.----

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी