शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या मुस्लिमांवरील अत्याचार थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:36 IST

म्यानमारच्या राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध सोमवारी नागपुरात मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांच्या शेकडो मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढून संविधान चौकात निदर्शने केली.

ठळक मुद्देसंविधान चौकात निदर्शने : विविध संघटनांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : म्यानमारच्या राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध सोमवारी नागपुरात मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांच्या शेकडो मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढून संविधान चौकात निदर्शने केली. आंदोलकांनी जोरदार नारेबाजी करून भारत सरकारला रोहिंग्या मुस्लिमांना मदत करण्याची मागणी रेटून धरली.संविधान चौकात आॅल इंडिया मजलिस-ए-ईत्तेहादुल मुस्लिमीन नागपूर आणि मरकजी सिरतुन्नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले. प्रदर्शनापूर्वी सीए रोड, मशीद मीर फैज जवळ, मकरजी सिरतुन्नबी कमिटीच्या कार्यालयात सभा घेण्यात आली. सभेनंतर बर्मा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलकांनी संविधान चौकापर्यंत मोर्चा काढला. संविधान चौकात आंदोलकांना मार्गदर्शन करताना मौलाना मुस्तफा म्हणाले, म्यानमारमधील दहशतवादाने सीमा गाठली आहे. एकाच समुदायाच्या नागरिकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे भारत सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करून तेथील नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करावी. मौलाना मुस्तफा रजा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कमिटीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात मरकजी सिरतुन्नबी कमिटीचे अध्यक्ष सय्यद मो. अली अशरफी, उपाध्यक्ष सय्यद परवेज रिजवी, अब्दुल लतीफ खान, उमरदराज खान, मो. कलाम, जावेद इकबाल, तारिक पटेल, वसीम खान, डॉ. ओवेश हसन, फैसल रंगूनवाला, अब्दुल रहमान, मौलाना मुस्तफा रजा, मौलाना अतीकुर्रहमान, आबिद ताजी, इरफान मुजावर, राजी अशफाक पटेल, हाजी शमीउल्लाह खान, हाजी मोहम्मद वाजीद, मो. समीर, मुश्ताक अली यांचा समावेश होता.‘एमडीपी, जमियत’ने सोपविले निवेदनमायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी(एमडीपी)चे राष्ट्रीय अध्यक्ष अलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान चौकात निदर्शने करून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. जमियत उलमा-ए-हिंदचे प्रदेश उपाध्यक्ष हाफीज मसूद अहमद यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सोपवून रोहिंग्या मुस्लिमांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय एमआयएमचे शहर अध्यक्ष नौशाद अली हैदरी यांच्या नेतृत्वात श्याम टॉकीज चौकात मूक प्रदर्शन करण्यात आले.