शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत ट्रेनवर भिलाईजवळ समाजकंटकाकडून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 21:42 IST

Nagpur News चार दिवसांपूर्वी मोठ्या थाटात शुभारंभ झालेल्या नागपूरहून बिलासपूर वंदे भारत हायस्पिड ट्रेनवर समाजकंटकाने दगडफेक केली. बुधवारी सायंकाळी ६. ९ वाजता भिलाई ते पॉवर हाऊस दरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनात खळबळ, पोलिसांकडून समाजकंटकाचा तपास सुरू

नागपूर : चार दिवसांपूर्वी मोठ्या थाटात शुभारंभ झालेल्या नागपूरहून बिलासपूर वंदे भारत हायस्पिड ट्रेनवर समाजकंटकाने दगडफेक केली. बुधवारी सायंकाळी ६. ९ वाजता भिलाई ते पॉवर हाऊस दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे ट्रेनच्या खिडकीचा काच क्षतिग्रस्त झाला असून या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत ट्रेनला ११ डिसेंबरला हिरवी झेंडी दाखवली. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या ट्रेनचा सर्वत्र गाजावाजा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना या ट्रेनबाबत एक वेगळे आकर्षण निर्माण झाले आहे. असे असताना शुभारंभा नंतरच्या चवथ्या दिवशी बुधवारी सायंकाळी ही ट्रेन छत्तीसगडमधील दुर्ग जवळच्या भिलाई पॉवर हाऊसजवळून धावत असताना अचानक तिच्या एक्झिकेटीव्ह चेअर कार कोचच्या खिडकीच्या काचेवर दगड आदळला. खिडकीची काच रेसिन आणि विनिल कोट असल्याने ती फुटली नाही मात्र काचेवर दगडाचे निशान (क्रॅक) उमटले. ट्रेन हायस्पिड असल्यामुळे ही घटना लक्षात येईपर्यंत ती बरेच किलिमिटर अंतरावर निघून गेली होती. दरम्यान, अज्ञात समाजकंटकाने वंदे भारत ट्रेनवर दगड मारल्याची घटना घडल्याचे गार्ड वरुणकुमार यांनी अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. आरपीएफच्या माध्यमातून लगेच रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

क्षतिग्रस्त काच बदलविलीदरम्यान, खिडकीची क्षतिग्रस्त काच बदलवून वंदे भारतला पुढे मार्गस्थ करण्यात आले. याप्रकरणात रेल्वे पोलिसच्या निरीक्षक पोर्णिमा राय बंजारे यांनी दगडफेक करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस