शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

नागपुरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 21:21 IST

प्रभाग २२ मधील जलकुंभासमोरील कडबी तणाव येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर पथक माघारी फिरताच झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली.

ठळक मुद्देसहायक आयुक्तांसह कर्मचारी जखमीजेसीबीच्या काचा फोडल्यामनपाच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग २२ मधील जलकुंभासमोरील कडबी तणाव येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर पथक माघारी फिरताच झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली. यात डोक्याला दगड लागल्याने प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी व जेसीबी चालक जखमी झाला. तसेच जेसीबीच्या काचाचे नुकसान झाले.कडबी तणास पडाव येथे महापालिकेच्या मालकीची आठ एकर जागा आहे. या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या लकडगंज झोनच्या प्रवर्तन विभागातर्फे झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानतंरही झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण न काढल्याने २ फे बु्रवारी २०१८ रोजी महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यात आले.अतिक्रमण हटविल्यानंतर पथक माघारी जाताना संतप्त झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली. यात अशोक पाटील यांच्या डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. दगडफेकीत लकडगंज पोलीस स्टेशनचे पीएसआय गडेकर, हेड कॉन्स्टेबल नाना कोठे, माया पिल्लेवान, जेसीबी चालक अज्जू शोला आदी जखमी झाले. पथकातील अन्य कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. दगडफेकीनंतर पथक लकडगंज पोलीस स्टेशनला पोहचले. दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. जखमीवर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.अतिक्रमण हटविण्याची कारवाई अशोक पाटील, प्रवर्तन अधीक्षक यादव जांभूळकर, नितीन मंथनवार, जमशेद अली, संजय शिंगणे, शरद इरपाते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर