शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजांनी कृत्रिमरित्या वाढविले खाद्यतेलाचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:03 IST

edible oil Nagpur News भाज्या, डाळींच्या किमती वाढल्यानंतर आता खाद्यतेल खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. महागाईचा चढता आलेख पाहता साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे.

ठळक मुद्देदरवाढीचा गरीब व सामान्यांना फटका सोयाबीन प्रति किलो ८ तर सोयाबीन २० रुपयांनी वाढले

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यतेल उत्पादक, ठोक विक्रेते आणि साठेबाजांनी यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी असल्याचे कारण सांगून आठवड्यातच सोयाबीन तेलाचे दर किलोमागे आठ रुपयांनी वाढविले आहे. भाज्या, डाळींच्या किमती वाढल्यानंतर आता खाद्यतेल खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. महागाईचा चढता आलेख पाहता साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे.रविवारी सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १०४ रुपयांवर पोहोचले आहे. ते गेल्या रविवारी ९६ रुपयांवर होते. याचप्रमाणे सनफ्लॉवर तेल प्रति किलो २० रुपये वाढीसह ११९ रुपये आणि राईस ब्रॅण्ड तेलाचे दर प्रति किलो ६ रुपयांनी वाढून १०७ रुपयांवर पोहोचले आहे. यंदा सोयाबीनचे पीक कमी आल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दरवाढ सुरू केली. पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. अशीच दरवाढ सुरू राहिली तर दरवाढ भरमसाट होणार होईल, अशी शक्यता काही व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यापूर्वी कोरोना काळात व्यापाऱ्यांनी सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १०६ रुपयांपर्यंत वाढविले होते. शासनाने दर निश्चित केल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशीपासूनच दर कमी झाले होते. ही दरवाढ आणि दरकपात कशी होते, हे एक गूढच असल्याचे किरकोळ विक्रेते म्हणाले.मूग गिळून बसला आहे अन्न विभागदरदिवशी वाढणाऱ्या अन्नपदार्थांच्या दराची माहिती अन्न व औषध विभागाकडे असते. पण विभाग व्यापा?्यांवर कारवाई करीत नाहीत. केवळ सणांनिमित्त तपासणी मोहीम राबवून अधिकारी वाहवा मिळवितात. ठोक कारवाई आणि व्यापाऱ्यांना पूर्वीच इशारा दिल्यास दरवाढ करण्याची हिंमत उत्पादक आणि ठोक व्यापारी करणार नाहीत. पण बातम्या छापून आल्यानंतर अधिकारी कारवाई करतात. पण तोपर्यंत व्यापारी साठा इतरत्र हलवितात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात काहीच लागत नाही, असा आरोप किरकोळ व्यापाऱ्यांनी केला.खाद्यतेल दरवाढीचा तक्ताखाद्यतेल            ४ ऑक्टो.           ११ ऑक्टो.सोयाबीन                 ९६ रु.             १०४ रु.सनफ्लॉवर              ९९ रु.                ११९ रु.राईस ब्रॅण्ड               १०१ रु.                १०७ रु.शेंगदाना                   १४० रु.           १४७ रु.साठेबाजांवर कारवाई करादरवाढीच्या संदर्भात विभागाचे अधिकारी आधीच सजग राहिल्यास कृत्रिम दरवाढीची मोठ्या व्यापाऱ्यांना भीती वाटेल. पण असे घडत नाही. दरवाढ झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे उघडतात आणि कारवाईसाठी पुढाकार घेतात. पण तोपर्यंत सर्व निस्तरले असते. मोठे व्यापारी नफा कमवून मोकळे होतात. याचा फटका गरीब आणि सामान्यांना बसतो. साठेबाजांवर कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी गांभीयार्ने लक्ष द्यावे.ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.

 

टॅग्स :foodअन्न