शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तरीसुद्धा स्मार्ट सिटीत घरे का तोडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:19 IST

स्मार्ट शहरासाठी नागपूर शहराची निवड झाली तेव्हा पूर्व नागपुरातील नागरिकांच्या आनंदाला उधाण आले होते. नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु काही दिवसात ४ हजार घरे तुटणार असल्याचे सांगण्यात आले. याला नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर २ हजार ३०० घरे तुटणार असल्याची माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या अंतिम नकाशाला मंजुरी दिल्यानंतर १२०० घरे अंशत: तर ५०० घरे पूर्णपणे तोडण्याचे निश्चित झाले. परंतु स्मार्ट शहरांच्या यादीत समावेश असलेल्या देशभरातील कोणत्याही शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी घरे तोडण्यात आलेली नाही. घरे तोडून स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. असे असूनही भाजपाचे स्थानिक प्रतिनिधी नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प देशभरात ‘युनिक’असल्याचा दावा करीत आहेत.

ठळक मुद्देदेशात स्मार्ट सिटीसाठी कोणत्याही शहरात घरे तोडलेली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट शहरासाठी नागपूर शहराची निवड झाली तेव्हा पूर्व नागपुरातील नागरिकांच्या आनंदाला उधाण आले होते. नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु काही दिवसात ४ हजार घरे तुटणार असल्याचे सांगण्यात आले. याला नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर २ हजार ३०० घरे तुटणार असल्याची माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या अंतिम नकाशाला मंजुरी दिल्यानंतर १२०० घरे अंशत: तर ५०० घरे पूर्णपणे तोडण्याचे निश्चित झाले. परंतु स्मार्ट शहरांच्या यादीत समावेश असलेल्या देशभरातील कोणत्याही शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी घरे तोडण्यात आलेली नाही. घरे तोडून स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. असे असूनही भाजपाचे स्थानिक प्रतिनिधी नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प देशभरात ‘युनिक’असल्याचा दावा करीत आहेत.दरम्यान अतिक्रमण करून शासकीय जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नासुप्रसुद्धा त्यांच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करणार आहे. यातून हजारो नागरिकांना घर मिळणार आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर शासनाची कृपा असताना नियमानुसार शुल्क भरणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय का? असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण आहे.नागरिकांची घरे उद्ध्वस्त करून उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीची आम्हाला गरज नाही. रस्ते रुंदीकरणाला व खाली जमिनीवर प्रकल्प उभारण्याला कुणाचाही विरोध नाही. शाळा, रु ग्णालयाची गरजच आहे. परंतु बांधलेली घरे तोडू नये, घरे तोडण्याचा निर्णय घेतला तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रकल्पगस्तांनी दिला आहे. असे असतानाही भाजपाचे काही नेते या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी स्वत: पाठ थोपटून घेत आहेत. भाजप नेत्याने स्वत:च्या फायद्यासाठी या प्रकल्पाच्या आराखड्यात दाट वस्तीत रस्ते टाकले आहेत. परंतु रस्ते निर्माण करून यातून कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कळमना ते भरतवाडा मार्ग ओलांडून पारडीपर्यंत जाणाऱ्या २४ मीटर रस्त्याला नागरिकांचा विरोध वाढत आहे. आमदार कृष्णा खोपडे व स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी हा रस्ता रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अंतिम नकाशात हा मार्ग कायम ठेवण्यात आला. त्यामुळे २५० घरे तुटण्याची शक्यता आहे.पक्की घरे देण्याची योजना नापासकेंद्र सरकारने झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पक्की घरे देण्यासाठी बीएसयूपी योजना सुरू केली. यासाठी निधी उपलब्ध केला. शहराच्या विविध भागात तीन ठिकाणी बीएसयूपीअंतर्गत फ्लॅट स्कीम तयार करण्यात आल्या. परंतु अशा योजनांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, रस्ते, गडर लाईन, पथदिवे अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारक राहण्यासाठी गेलेले नाहीत. या योजनेचा ५० कोटीचा निधी महापालिकेच्या खात्यात पडून आहे.

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका