शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गृहविलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गृहविलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. याचा विचार करता मनपा प्रशासनाने

गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टीकर लावणे सुरू केले आहे. स्टीकरवर पॉझिटिव्ह कोविड-१९ रुग्ण होम आयसोलेशन असे नमूद करून त्यामध्ये रुग्णाचे नाव व होम आयसोलेशनचा कालावधी (केव्हापासून केव्हापर्यंत) सुद्धा त्यामध्ये नमूद केले जात आहे.

मनपा आयुक्त राधकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपाच्या सर्व दहा झोन कार्यालयाअंतर्गत ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन करावे याबाबत मनपाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशानुसार गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार दंड तसेच पोलीस कारवाई केली जात आहे. सर्व झोनमध्ये सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी नियम निर्धारित करण्यात आले आहेत. अनेक कोरोनाबाधितांकडून गृह विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

...

झोन स्तरावर भरारी पथ्क

सक्तीने गृह विलगीकरणाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी झोन स्तरावर भरारी पथक (फ्लाईंग स्कॉड) गठित करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणाशिवाय गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय ५ हजार दंडह वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.