शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मोकाट कुत्र्यांवर नसबंदी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:27 IST

नागपूर शहरात ९० हजार बेवारस कुत्री असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची मोहीम महापालिका राबविणार आहे. बुधवारी महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.

ठळक मुद्देआजपासून सुरुवात : पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाहीशहरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात ९० हजार बेवारस कुत्री असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची मोहीम महापालिका राबविणार आहे. बुधवारी महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमातही मोकाट डुकरे व कुत्र्यांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. मोकाट कुत्री व डुकरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यानुसार डुकरे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याची जबाबदारी वेस्ट फॉर अ‍ॅनिमल्स रिकगनाईज बाय अ‍ॅनिमल या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. दररोज ५० मोकाट कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणच्या मोकाट कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. यात रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक, विमानतळ व बाजार भागातील कुत्र्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.‘डॉग रुल २००१’नुसार मोकाट कुत्र्यांना पकडून दुसरीकडे सोडता येत नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी नसबंदी व उपचार हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. २००१ चा मोकाट कुत्र्याबाबतचा कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे मोकाट कुत्र्यांना पकडून दुसरीकडे नेता येत नाही. तसेच पशुप्रेमी कायद्याचा आधार घेत कुत्र्यांना पकडण्याला विरोध दर्शवितात. दुसरीकडे सक्षम यंत्रणा नव्हती. यामुळे महापालिकेचा कोंडवाडा विभाग हतबल असल्याचे चित्र मागील काही वर्षांत निर्माण झाले होते. नसबंदी मोहिमेमुळे मोकाट कुत्र्यांना काही प्रमाणात आळा बसणार आहे.नसबंदीनंतर कुत्र्यांना परत सोडणारमोकाट कुत्र्यांबाबत तक्रार आल्यास अशा कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी केली जाणार आहे. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडले जाणार आहे. यासाठी झोनच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे.

 

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर