शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांकडील वसुलीला स्थगिती : हायकोर्टाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:26 IST

आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शिक्षकांकडील अतिरिक्त वेतन वसुलीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून वसुलीविरुद्धच्या आक्षेपांवर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देराज्य सरकारला मागितले उत्तर

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शिक्षकांकडील अतिरिक्त वेतन वसुलीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून वसुलीविरुद्धच्या आक्षेपांवर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वादग्रस्त वसुलीविरुद्ध अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विलास आळे यांच्यासह इतर २४ शिक्षकांनी अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ६ ऑगस्ट २००२ रोजीच्या शासन निर्णयानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना, ते संबंधित भागात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि वेतनाच्या १५ टक्के प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे. याचिकाकर्त्यांना या निर्णयाचा लाभ देण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेने याचिकाकर्त्यांना कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करून एकस्तर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ काढून घेतला. निर्णयानुसार, कर्मचाऱ्याला, तो आदिवासी-नक्षलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंत, एकस्तर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देणे आवश्यक आहे. सुगम भागात बदली झाल्यानंतरच त्याला कालबद्ध वेतनश्रेणी लागू केली जाऊ शकते. परंतु, जिल्हा परिषदेने आदिवासी-नक्षलग्रस्त भागात १२ वर्षे सेवा दिलेल्या याचिकाकर्त्यांना कालबद्ध वेतनश्रेणी लागू केली. ही वेतनश्रेणी एकस्तर वरिष्ठ वेतनश्रेणीपेक्षा कमी लाभाची आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांवर एक ते तीन लाख रुपयापर्यंत वसुली काढण्यात आली आहे. एवढेच नाही तर, मासिक वेतनातून पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत वसुली करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. ही कृती अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. वसुली अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक