शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दगड उत्खननाची लीज देण्यावर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 20:13 IST

राज्यामध्ये कुठेही दगड उत्खननाची नवीन लीज देण्यात येऊ नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : नवीन धोरणानुसार लिलाव आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये कुठेही दगड उत्खननाची नवीन लीज देण्यात येऊ नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला.दगड उत्खननाची लीज देण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात आले असून त्यानुसार सार्वजनिक लिलाव पद्धतीद्वारे लीज देणे आवश्यक आहे. परंतु, जिल्हाधिकारी सार्वजनिक लिलाव प्रक्रिया न करता नवीन लीज देत असल्याचे व मुदत संपलेल्या लीजचे नूतनीकरण करण्याचे अर्ज नवीन धोरणाच्या नावाखाली प्रलंबित ठेवत असल्याचे न्यायालयाला प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला. तसेच, महसूल विभागाचे सचिव व गोंदिया जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले.यासंदर्भात उदयकुमार परमार व इतर तिघांनी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांना २०१३ मध्ये रायपूर, बालमटोला व भाजियापार येथील घाटांची लीज मिळाली होती. मुदत संपल्यामुळे त्यांनी लीजच्या नूतनीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले. परंतु, त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. नवीन धोरणामुळे लिलावाद्वारेच लीज देण्यात येईल असे सर्वांना सांगितले जात आहे. तसेच, दुसरीकडे लिलाव प्रक्रिया न करता लीज दिली जात आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे