शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल द्या, भटकंती थांबवा

By admin | Updated: July 26, 2016 02:31 IST

स्वातंत्र्यानंतरही मागील ६६ वर्षांपासून विमुक्त भटक्या जमाती या भटकंतीच करीत आहेत; ...

भटके विमुक्तांची मागणी : तहसील कार्यालयांवर धडक नागपूर : स्वातंत्र्यानंतरही मागील ६६ वर्षांपासून विमुक्त भटक्या जमाती या भटकंतीच करीत आहेत; तेव्हा आम्हाला घरकूल द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व द्या आणि आमची भटकंती थांबवा, अशी मागणी करीत शेकडोंच्या संख्येने भटके विमुक्त समाजबांधवांनी सोमवारी तहसील कार्यालयांवर धडक दिली. संघर्ष वाहिनी या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी संविधान चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. भटके विमुक्तांना घरकूल मिळावे, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व मिळावे, मासेमारी करणाऱ्या लोकांवर मस्त्यव्यवसाय विभागाच्या २६ जून २०१४ च्या आदेशाने उपासमारीचे संकट आले त्यामुळे तो आदेश ताबडतोब रद्द करावा, भूमिहीनांना जमीन मिळाव्यात, बेरोजगारांना रोजगार मिळावा, सुलभ कर्ज मिळावे, जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कागदपत्रांच्या अटी शिथिल कराव्यात, क्रिमीलेयरची अट रद्द व्हावी, जिल्हास्तरावर वसतिगृह मिळावे, धरणग्रस्त मासेमाऱ्यांना मासेमारीचे हक्क द्या, शाळेत मुलाना गणवेश मिळावा, राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. नागपूरसह सर्व १३ तालुके आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयांवर एकाच वेळी मोर्चा काढण्यात येऊन या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणयात आले. राजेंद्र बडीये यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात पुंडलिक बावनकुळे, गजानन बोराल, पंकज बनसोड, धर्मपाल शेंडे, श्रीराम गोहोणे, प्रमोद मेश्राम, मनीष बात्हो, शंकर पुंड, विनायक सूर्यवंशी, गोविंद राठोड, सदाशिव हिव्लेकर, विनोद आकुलवार, दिलीप कैलूके, दिलीपसिंग सूर्यवंशी आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनाच्या निषेधार्थ मुंडणभटके विमुक्त समाजबांधवांच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वीसुद्धा विदर्भातील ४२ तहसील कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. परंतु शासनाकडून त्या मोर्चाची साधी दखलही घेण्यात आली नाही. शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून मुंडणसुद्धा करण्यात आले.