शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

संदीप जोशी यांना कंपनी संचालकपदाकरिता अपात्र ठरविण्यावर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 8:07 PM

महापौर संदीप जोशी यांना कंपनी संचालकपदाकरिता पाच वर्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर रद्द करण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली.

ठळक मुद्दे हायकोर्टाचा दिलासा : केंद्र सरकार, कंपनी रजिस्ट्रारला नोटीस जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी यांना कंपनी संचालकपदाकरिता पाच वर्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर रद्द करण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, केंद्रीय कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय व कंपनी रजिस्ट्रार यांना नोटीस बजावून वादग्रस्त आदेशावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कंपनी रजिस्ट्रारने जोशी यांच्यावर कंपनी कायद्यातील कलम १६४(२) अंतर्गत वादग्रस्त कारवाई केली आहे. ही कारवाई अवैध असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे. जोशी हे शहर बस संचालनाकरिता २८ जुलै २००९ रोजीच्या प्रस्तावानुसार स्थापन करण्यात आलेल्या व ११ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या प्रस्तावानुसार मोडीत काढण्यात आलेल्या नागपूर महानगर परिवहन कंपनीचे एप्रिल-२०१० ते मार्च-२०१२ पर्यंत पदसिद्ध संचालक होते. त्या काळात ते महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. त्या कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे जोशी यांच्यावर वादग्रस्त कारवाई करण्यात आली आहे. परंतु, जोशी यांनी त्यांच्यावरील कारवाईकरिता देण्यात आलेली कारणे अमान्य केली आहेत. नागपूर महानगर परिवहन कंपनीचा व्यवहार पारदर्शी होता. ती कंपनी नियमित प्राप्तिकर जमा करीत होती. तसेच, या कंपनीचे संचालकपद मार्च-२०१२ मध्ये सोडले होते व कंपनी कायद्यात समावेश करण्यात आलेले १६४(२) कलम एप्रिल-२०१४ पासून पुढे लागू होते. याशिवाय वादग्रस्त कारवाई करताना नोटीस बजावून सुनावणीची संधी देण्यात आली नाही. परिणामी, नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन झाले. करिता वादग्रस्त कारवाई अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, असे जोशी यांचे म्हणणे आहे. जोशी यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण व अ‍ॅड. निखिल कीर्तने यांनी कामकाज पाहिले.स्मार्ट सिटीच्या बैठकीत सहभागी होता येईलउच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यामुळे जोशी यांना नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनच्या बैठकांमध्ये सहभागी होता येणार आहे. ही कंपनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी १ जुलै २०१६ रोजी प्रस्ताव पारित करण्यात आला होता. कंपनीच्या आर्टिकल आॅफ असोसिएशननुसार जोशी हे महापौर या नात्याने कंपनीचे पदसिद्ध संचालक आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSandip Joshiसंदीप जोशी