शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील स्थिती : डिझेलअभावी दुसऱ्या दिवशीही एसटीच्या फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:15 IST

डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे एसटी बसेस रद्द झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेल नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या विविध आगारात हजारो किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे एसटी बसेस रद्द झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेल नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या विविध आगारात हजारो किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.गुरुवारी डिझेलचा तुटवडा असल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. आजही हीच परिस्थिती पाहावयास मिळाली. इमामवाडा आगारात डिझेल नसल्यामुळे आकोट, अमरावती, आदिलाबाद अशा १० बसेस रद्द कराव्या लागल्या. इमामवाडा आगारात सायंकाळपर्यंत डिझेल उपलब्ध झाले नव्हते तर मध्यवर्ती गणेशपेठ आगारात डिझेल नसल्यामुळे ४ हजार किलोमीटरच्या १५ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी महामंडळावर आली. दुपारी १ वाजता गणेशपेठ आगारात डिझेलचे टँकर आल्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत झाली. घाट रोड आगारातही १५ फेºया रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्धमाननगर आगारातही डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती आहे. डिझेल नसल्यामुळे बसेस रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यांना आल्यापावली परत जाण्याची वेळ आली. यामुळेअनेक प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे. याबाबत एसटीच्या नागपूर विभागाच्या विभागीय वाहतूक अधिकारी तनुजा काळमेघ यांनी डिझेलचे ऑनलाईन पेमेंट करताना व्यत्त्यय आल्यामुळे डिझेलचे टँकर उशिराने पोहोचल्याची माहिती दिली.चालकांवर ओरडत आहेत प्रवासीडिझेलचा तुटवडा असल्यामुळे एसटीच्या चालकांवर प्रवासी आपला राग काढत आहेत. घाट रोड आगाराची बस नागपूरवरून वरुडला गेली. तेथे डिझेल कमी असल्यामुळे ही बस वरुड आगारात नेण्यात आली. परंतु या आगारात डिझेल देण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. या बसमध्ये प्रवासी बसून असल्यामुळे ते संतापले. तासभरानंतर डिझेल मिळाल्यावर ही बस नागपूरकडे रवाना झाली. डिझेल नसल्यामुळे बस उभ्या होत असून प्रवासी चालकांवर रोष व्यक्त करीत असल्याची माहिती एसटीच्या चालकांनी दिली.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकDieselडिझेल