कामठी/ कळमेश्वर/ नरखेड/ पारशिवनी : सरकार खासगीकरण, उदारीकरण, कंत्राटी पद्धतीचा अवलंब करीत असून, भत्ते, पेन्शन, कल्याणकारी याेजना, राेजगार, आराेग्यसेवा प्रदान करणे आपली जबाबदारी नाही, असे संकेत देत आहे. या सर्व बाबींना विराेध करण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. २६) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला हाेता. या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमाेर धरणे आंदाेलने करीत त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे साेपविले. या आंदाेलनामुळे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणांसह ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले हाेते.
कामठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी कामठी तहसील कार्यालयासमाेर निदर्शने करीत तहसीलदार गणेश जगदाळे यांच्याकडे निवेदन साेपविले. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी या निवेदनात दिला. या आंदाेलनात तालुक्यातील शेख शरीफ, गजेंद्र वंजारी, अमाेल पाेळ, वर्षा भुजाडे, नितीन टेंभुर्णे, बेबीनंदा झाेटिंग, वसुंधरा मानवटकर, माधुरी निंबाळकर, एस. एन. चंद्रिकापुरे यांच्यासह अन्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले हाेते. या आंदाेलनात कळमेश्वर तहसील कार्यलयातील १६ कर्मचारी सहभागी झाले हाेते. या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन केल्यानंतर शिष्टमंडळाने नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांना निवेदन दिले. आंदाेलनात बिलाल खान, संदीप जाधव, हर्षल गाेहणे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले हाेते.
या आंदाेलनात नरखेड तालुक्यातीलही कर्मचारी सहभागी झाले हाेते. त्यांनी तहसील कार्यालयासमाेर निदर्शने करीत घाेषणाबाजी केली. यावेळी एस. पी. गायकवाड, ए. एस. मडावी, आर. एस. पवार, पी. जी. ढाेके, डी. आर. चव्हाण, आर. एस. सुने, शेख मुजीब, एस. एन. ठाकरे, आर. एस. नितनवरे, एम. एल. पवार, पी. व्ही. रामटेके, एम. के. चवळे, के. एन. जाधव, पी. आर. चलपे, आर. एच. राऊत, ए. पी. देशमुख, एन. एन. लिंगायत, अरविंद गजभिये, आर. के. ढाेरे, डी. एस. काेकर्डे, आर.एस. आखाडे, के.एस. बागडे, एस. बी. कठाणे, टी. व्ही. लांजेवार, आर. बी. मडके, संदीप काैरती यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते.
पारशिवनी येथील कर्मचारी गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तहसील कार्यलयाच्या आवारात गाेळा झाले हाेते. धरणे आंदाेलनानंतर त्यांनी कार्यालयासमाेर निदर्शने केली. त्यांनी तहसीलदार वरुणकुमार सहारे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविले. या आंदाेलनात महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमाेद वराडे, सुनील जाधव, अंकित डांगे, गजेश बाेबडे, प्रवीण जाधव, जयंत कळंबे, प्रशांत गजभिये, बंडू उकेडुमरे, राजीव येलुतवार यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले हाेते.
....
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
केंद्र शासनाने ‘पीएफआरडीए’ कायदा मंजूर केल्याने अंशदायी पेन्शन याेजनेची पाळेमुळे मजबूत हाेणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सेवा शाश्वती धाेक्यात येणार असल्याने अंशदायी पेन्शन याेजना रद्द करून जुनी पेन्शन याेजना लागू करा. सातवा वेतन आयाेगाने केलेली वेतनवाढ कमी प्रमाणात देण्यात आली. बक्षी समिती अहवालाचा दुसरा खंड प्रलंबित असल्याचे त्यावर अंमल करावा. राज्यात विविध विभागातील अंदाजे १ लाख ५७ हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने नाेकरभरती करावी. नाेकरीतील अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादी निकाली काढावी. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदाेलन करण्यात आले.