शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीतील आरक्षणासाठी राज्यभरात आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 22:35 IST

Statewide outcry for reservation in promotion मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील संवैधानिक आरक्षण संपवण्यात आल्याच्या निषेधार्थ विविध मागासवर्गीय संघटनांच्या संयुक्त आरक्षण हक्क कृती समितीतर्फे शनिवारी राज्यभरात आक्रोश आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआरक्षण हक्क कृती समितीचे आंदोलन : सत्ताधारी व विरोधकांवर साधला निशाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील संवैधानिक आरक्षण संपवण्यात आल्याच्या निषेधार्थ विविध मागासवर्गीय संघटनांच्या संयुक्त आरक्षण हक्क कृती समितीतर्फे शनिवारी राज्यभरात आक्रोश आंदोलन करण्यात आले. ७ मे चा आदेश रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.नागगपुरात संविधान चौकात एक जाहीर सभा घेण्यात आली. जुन्या सरकारच्या काळात मागासवर्गीयांना पदोन्नती न देता फक्त खुल्या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. आता विद्यमान सरकारने ७ मे रोजी आदेश काढत पदोन्नतीतील आरक्षणच संपविले. मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण हे संविधानिक असताना ते नाकारण्यात आले. हा मागासवर्गीयांवर अन्याय असून भाजप-सेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे सारेच पक्ष मागासवर्गीयांच्या विरोधात असून याविराेधात एकजूटपणे लढावे लागेल, असा सूर यावेळी वक्त्यांनी काढला.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला एक निवेदन सादर करण्यात आले. यात ४.५ सरळ सेवा भरतीतील रिक्त पदांचा अनुशेष भरावा, उच्च शिक्षणासाठी फ्रीशिप लागू करावी, भटक्या विमुक्तांना लागू असलेली क्रिमीलेअरची अट रद्द करावी, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण द्यावे, उपसमितीतून अजित पवार यांनी हटवून मागासवर्गीय मंत्र्यांची नेमणूक करावी, आदींसह एकूण १६ मागण्यांचा समावेश होता.समितीचे निमंत्रक नरेंद्र जारोंडे आणि अरुण गाडे यांनी आंदोलनाची भूमिका विषद केली. डॉ. पुरण मेश्राम यांनी संचालन केले. आंदोलनात डॉ. सुखदेव थोरात, कुलदीप रामटेके डॉ. प्रदीप आगलावे, माजी आमदार प्रकाश गजभिये, उपेंद्र शेंडे, अशोक सरस्वती, सरोज आगलावे, छाया खाेब्रागडे, तक्षशीला वाघधरे, पल्लवी वाहाने-जीवनतारे, शिवदास वासे,भुपेश थुलकर, अनिल नगरारे, प्रवीण कांबळे, अतुल खोब्रागडे, ऍड. स्मिता कांबळे, नारायण बागडे, सुधीर भगत, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, मधुकर उईके,राहुल परुळकर, सुरेश तामगाडगे, राजेश ढेंगरे, प्रकाश बंसोड, राहुल दहीकर, नितीन गजभिये, सोनिया गजभिये, बलदेव आडे, नामा जाधव, रवी शेंडे, उत्तम शेवडे, विजय मेश्राम, सीताराम राठोड, सागर डबरासे, नायक चव्हाण, अनिल ढोले आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनreservationआरक्षण