शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे नवे वाळू धोरण लवकरच; चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:54 IST

राज्याचे नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.

ठळक मुद्देनागपुरातील ‘इनर रिंग रोड’च्या कामासाठी स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलातून कपात

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्याचे नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.आमदार अमर काळे, विजय वडेट्टीवार, रणजित कांबळे, प्रा. वीरेंद्र जगताप, अ‍ॅड. यशोमती ठाकूर आदींनी या नागपुरातील इनर रिंग रोडसंबंधीच्या स्वामित्व धनासंबंधी लक्षवेधी सूचना सादर केली होती. त्यावर उत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांच्या कामासाठी वापरलेल्या गौण खनिजाच्या वापरासाठीचे स्वामित्व धन संबंधित कंत्राटदारांनी भरले की नाही याची खात्री करुनच त्यांना अंतिम बिल दिले जाते. नागपुरातील इनर रिंग रोडची सुधारणा करण्याचे काम प्रगतिपथावर असून हे काम करणाºया कंत्राटदारास प्रदान करण्यात आलेल्या देयकांमधून गौण खनिजासाठीच्या स्वामित्व धनाच्या फरकाच्या अनुषंगाने ५८.४७ लाख रुपये इतक्या रकमेची कपात करण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनीदिली.नागपूर शहरातील अंतर्गत वळणमागार्ची सुधारणा करण्याचे काम आर. पी. एस. इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्याकडे आहे. या कामाची किंमत २०४.५२ कोटी रुपये इतकी आहे. सध्या ११५ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून कंत्राटदारास ७९.४९ कोटी रुपयांचे देयक अदा करण्यात आले आहे. या कामामध्ये वापरण्यात आलेल्या ८१ हजार १२४ ब्रास खनिजावर देय स्वामित्व धन हे एकूण कोटी २४ लाख रुपये असून ते शासनास अदा केल्याबाबतचे ट्रान्झिट पास कंत्राटदाराने सादर करणे आवश्यक आहे. तथापि, कंत्राटदाराने ६९ हजार ९५५ ब्रास खनिजाच्या स्वामित्व धनाच्या २ कोटी ८० लाख रुपयांच्या पावत्या (ट्रान्झिट पास) सादर केल्या आहेत. ११ हजार १६९ ब्रास खनिजाच्या ४४.६७ लाख रुपयांच्या पावत्या सादर केलेल्या नाहीत. त्यामुळे कंत्राटदारास प्रदान करण्यात आलेल्या देयकांमधून स्वामित्व धनाच्या फरकाच्या अनुषंगाने ५८.४७ लाख रुपये इतक्या रकमेची कपात करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७chandrakant patilचंद्रकांत पाटील