शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मुंडे यांच्या निधनाने राज्याची हानी

By admin | Updated: June 16, 2014 01:08 IST

केंद्र्रीय ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांच्या निधनामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांला दु:ख झाले असून राज्याची भरून न निघणारी हानी झाल्याचे प्रतिपादन

अस्थिकलश नागपुरात : गडकरींची श्रद्धांजलीनागपूर : केंद्र्रीय ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांच्या निधनामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांला दु:ख झाले असून राज्याची भरून न निघणारी हानी झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. मुंडे यांचे दोन अस्थिकलश सकाळी विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईहून नागपुरात आणले. ते गणेशपेठ येथील पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले. अस्थिकलशाचे दर्शन घेऊन मुंडे यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिल्यानंतर गडकरी बोलत होते.पंचायत समितीचे सभापती अजय बोढारे व पक्षाचे शहर उपाध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी मुंबईहून दोन अस्थिकलश नागपुरात आणले. अस्थिकलश घेण्यासाठी अजनी रेल्वे स्टेशनवर खासदार अजय संचेती, माजी खा. बनवारीलाल पुरोहीत, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, ग्रामीण अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. सुधाकर देशमुख, विजय घोडमारे, विकास कुंभारे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, संजय भेंडे,श्रीपाद रिसालदार, सुधीर हिरडे, मनोज पांडे, प्रभाकर येवले, सुधाकर कोहळे, प्रमोद पेंडके, श्रीकांत देशपांडे, डॉ. रवींद्र भोयर, माजी महापौर कल्पना पांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, अविनाश ठाकरे जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी आ. अशोक मानकर, अविनाश ठाकरे, राजेश बागडी, चेतना टाक व चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते. अस्थिकलश सजवलेल्या जीपमधून सन्मानाने गणेशपेठ येथील कार्यालयात आणले. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी पक्ष कार्यक र्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी गडकरी यांच्यासह महापौर अनिल सोले, सत्तापक्षनेते प्रवीण दटके, भाजपच्या प्रदेश महिला अध्यक्ष सीमा वाघ, जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे, उपमहापौर जैतुन्नबी पटेल,जि.प.सदस्य पे्रम झाडे, बंडू राऊ त, बंटी कुकडे, संदीप गवई, संदीप जाधव, डॉ. सुरेश चांडक, रिना कुत्तरमारे संजय फांजे, मनिषा कोठे यांच्यासह शहर व ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.सोमवारी सायंकाळी ५ वाजता अस्थिकलशांचे कन्हान नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)