शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नगर विकास राज्यमंत्र्यांनी कार्यक्षमता सिद्ध करावी  : हायकोर्टाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 19:36 IST

नगर विकास राज्यमंत्र्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करवून घेऊन स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करावी अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवणीतील दुकाने लिलावाचे प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगर परिषदेच्या मालकीची १६० दुकाने रिकामी करून त्यांचा लिलाव करण्याचा आदेश नगर विकास राज्यमंत्र्यांनी ७ मार्च २०१९ रोजी दिला होता. त्या आदेशाचे अद्याप पालन झाले नाही. त्यामुळे नगर विकास राज्यमंत्र्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करवून घेऊन स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करावी अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली आहे. तसेच, नगर विकास राज्यमंत्र्यांना यावर १५ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग टोंगे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नगर विकास राज्यमंत्री अकार्यक्षम आहेत. ते स्वत:च्या आदेशाची अंमलबजावणी करू शकत नाही. तसेच, त्यांच्या आदेशाची पायमल्ली झाल्यानंतरही जबाबदार अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही असा संदेश समाजात जायला नको असे मतही न्यायालयाने सुरुवातीला व्यक्त केले. तसेच, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी व नगर परिषद यांनादेखील नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.संबंधित दुकाने अवैध ताब्यात आहेत. त्यामुळे ६ नोव्हेंबर २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने रिकामे करून त्यांचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाविरुद्ध दुकानदारांनी नगर विकास राज्यमंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. राज्यमंत्र्यांनी ७ मार्च २०१९ रोजी ते अपील खारीज करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. असे असताना नगर परिषदेने दुकाने रिकामे करण्यासाठी काहीच कारवाई केली नाही. यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनाचीही दखल घेतली नाही. दुकानांचा लिलाव केल्यास नगर परिषदेला कोट्यवधी रुपये मिळतील. त्यातून शहरामध्ये विविध विकासकामे करता येतील असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे व अ‍ॅड. महेश धात्रक तर, सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद फुलझेले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयministerमंत्री