शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्याने कायदा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:26 IST

पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देअशोक चव्हाण, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेची निवडणूक किंवा विश्वासदर्शक ठरावासंबंधीच्या मतदानाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता असते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत गुप्त पद्धतीने मतदान घेऊ नये, असे आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रात विश्वासदर्शक ठरावादरम्यान महाविकास आघाडीचे सरकार जिंकू शकले. अशा प्रकारच्या मतदानादरम्यान पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली. अशोक चव्हाण यांच्यासह राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर वरिष्ठ संपादकांशी संवाद साधला. 

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच राज्यात घोडेबाजार होऊ शकला नाही. सर्वोच्च न्यायालयामुळे विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान पारदर्शकता आली. सरकार कुणाचेही असो, विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदान हे गुप्त पद्धतीने घेऊ नये. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वाव मिळतो. त्यामुळेच खुल्या पद्धतीने मतदान घेतले जावे, असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री असताना शेततळे योजना ही विदर्भासाठी तयार करण्यात आली होती. पण त्याची व्यापक पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही. त्याचा फायदा इतर विभागांनाच जास्त झाला, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या व त्यांना नफा मिळावा यासाठी शेतीतील विविध प्रयोग राबविण्याची आवश्यकता आहे. सोबतच योग्य दिशेने जागृतीदेखील झाली पाहिजे. नागपुरात एखाद्याला पुष्पगुच्छ देत असताना त्यातील फुले बाहेरून आणावी लागत असतील तर ते विदर्भाच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. हे एक उदाहरण झाले. पण लहान लहान गोष्टींतून जास्त रोजगार कसे वाढतील याचे नियोजन झाले पाहिजे. असे झाले तरच विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. आमचे सरकार त्यादृष्टीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नागपुरातील अधिवेशनात आमदारांची मैत्रीनागपुरातील हिवाळी अधिवेशन हे अनेक प्रकारे फायद्याचे ठरते. येथे राजकीय चर्चा, विदर्भाचे मुद्यांवर मंथन तर होतेच. शिवाय आमदारांनादेखील बरेच काही शिकायला मिळते. या अधिवेशनात आमदार विविध मुद्यांवर एकमेकांशी सखोल चर्चा करु शकतात. यामुळे त्यांच्या सलोखा वाढतो व मैत्री होते. भविष्यात नागपुरात होणाऱ्याअधिवेशनाचा कालावधी निश्चितपणाने वाढविण्यात येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :LokmatलोकमतBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणChagan Bhujbalछगन भुजबळVijay Dardaविजय दर्डा