वाशिम: जिल्हा तलवारबाजी संघटना व वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तलवारबाजी स्पर्धेचा २0 जूलै रोजी समारोप करण्यात आला. १८ जुलैपासून २0 जुलै २0१४ ला रविवार स्पध्रेचे बक्षीस वितरणाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे राजेंद्र पाटणी, प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, व राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष काटूळे सचिव उदय डोंगरे, दिलीपराव जाधव, वाशिम न.प.नगराध्यक्षा लताबाई उलेमाले, बी.के.राठोड, अनिल केंदळे यांची यावेळी उपस्थिती होती. प्रथम क्रमांक औंरगाबाद संघटनेने पटकाविला. दुसरा क्रमांक ठाणे मुली मध्ये पहिला क्रमांक नागपूर, व्दितीय क्रमांक नाशिक संघाने पटकावला. यांचा गौरव ट्रॉफी व मेडल देवून गुण गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन किशोर राठोड यांनी केला. या तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन वाशिम जिल्हा तलवार बाजारी संघटनेचे सचिव आर.आर.पवार, सुरेश राठोड, संदेश पवार, ङ्म्रीकांत राठोड, रामराव राठोड, टी.आर.राठोड, नरेश मलीक, खेळ संघटक मित्र मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. अतिषय उत्साहात या स्पर्धा पार पडल्या.
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबाद अव्वल
By admin | Updated: July 22, 2014 00:56 IST