शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

राज्याने वाढविला पेट्रोल व डिझेलवर एक रुपया अधिभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:55 IST

राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार १ एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपया अधिभार (सेस) वाढविला आहे. त्यामुळे नागपुरात पेट्रोलचे दर ७६.७८ रुपये आणि डिझेल ६५.७४ रुपयांवर पोहोचले आहे.

ठळक मुद्दे पेट्रोल ७६.७८ व डिझेल ६५.७४ रुपये कच्च्या तेलाच्या दराचा नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार १ एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपया अधिभार (सेस) वाढविला आहे. त्यामुळे नागपुरात पेट्रोलचे दर ७६.७८ रुपये आणि डिझेल ६५.७४ रुपयांवर पोहोचले आहे. महागाईच्या काळात राज्य शासनाने ग्राहकांवर दरवाढीचा पुन्हा बोजा टाकला आहे. या अनावश्यक दरवाढीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीयस्तरावर कच्च्या तेलाचे दर २६.७३ डॉलर प्रति बॅरल या नीचांक किमतीवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा फायदा केंद्र आणि राज्य सरकारने ग्राहकांना होऊ दिला नाही. सन २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा पेट्रोलवर अबकारी कर ९.४८ रुपये आणि डिझेलवर ३.५६ रुपये होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील निरंतर घसरणीचा फायदा सरकारने ग्राहकांना मिळू दिला नाही. याशिवाय कोरोना व्हायरसमुळे जगात पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी झाली आहे. परिणामी, कच्च्या तेलाला मागणी कमी होऊन भाव गडगडले. त्यानंतर देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी व्हायला हवे होते. पण १४ मार्चला केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पेट्रोल आणि डिझेलवर अबकारी कर आणि रोड अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सेस वाढविला. तेव्हापासून पेट्रोलवर २२.९८ रुपये आणि डिझेलवर १८.८३ रुपये अबकारी कर आणि १० रुपये रोड अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आकारण्यात येत आहे. कच्च्या तेलाच्या दरकपातीने ग्राहकांना पेट्रोल ५० रुपयाच्या आत मिळायला हवे, पण ७६.७८ रुपये खरेदी करावे लागत आहे.२५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निरंतर कमी होत असल्याचा फायदा ग्राहकांना होऊ न देता भाव ‘जैसे थे’ आहेत. उलट राज्य शासनाने अधिभार वाढवून महागाईत भर टाकली. कोरोनामुळे संपूर्ण शहर लॉकडाऊन आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होऊन इंधनाची मागणी आता २० टक्के राहिली आहे. काही पंप केवळ दिवसा चार ते सहा तास सुरू आहेत. भविष्यात लॉकडाऊन संपल्यानंतर जनजीवन पूर्ववत झाल्यानंतर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर कोरोना सेस लावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काही विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर ८.२० रुपये सेस व २५ टक्के व्हॅटएक रुपया वाढ केल्यानंतर आता महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर ८.२० रुपये अधिभार (सेस) आकारण्यात येत आहे. याशिवाय केंद्र सरकारने अबकारी कर आकारल्यानंतर ठरलेल्या किमतीवर राज्य सरकार २५ टक्के व्हॅट आकारते. या सर्व करवाढीच्या चक्रात पेट्रोल आणि डिझेलवर तिप्पट विविध कर आकारणी करण्यात येत आहे. यात ग्राहक भरडला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या टप्प्यात आणण्याची नागरिकांची पूर्वीपासूनच मागणी आहे. याशिवाय जीएसटीचा फायदा ग्राहकांना होऊन पेट्रोलियम डीलर्सची गुंतवणूकही कमी होणार आहे. पण पेट्रोलियम पदार्थांपासून सर्वाधिक कर मिळत असल्याने केंद्र सरकार हा निर्णय कधीही घेणार नाही, असे काही डीलर्सने सांगितले.

 

टॅग्स :Petrolपेट्रोल