शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन परिषद निवडणुकीवर यथास्थिती ठेवण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 20:53 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये यथास्थिती ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये यथास्थिती ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला.अनुसूचित जाती प्रवर्गातील सिनेट सदस्य डॉ. भीमराव वाघमारे व इतर दोघांनी आरक्षण प्रक्रियेवर आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरू यांना नोटीस बजावून यावर २६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार संघात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवणे आवश्यक होते. परंतु, राज्यपालांनी २८ नोव्हेंबर २०१७ रोजी वटहुकूम जारी करून विद्यापीठ कायद्यातील ३० व्या कलमात दुरुस्ती केली. त्याद्वारे काहीही गरज नसताना आरक्षणाबाबत नवीन प्रक्रिया लागू करण्यात आली. त्या वटहुकूमाला विधिमंडळ अधिवेशनात मंजुरी मिळाली नाही. तो वटहुकूम कायद्यानुसार २१ जानेवारी २०१८ रोजी रद्द होणार होता. परिणामी, राज्यपालांनी २० जानेवारी रोजी पुन्हा समान वटहुकूम जारी केला. त्यानुसार, मतदार संघाचे आरक्षण ठरवून त्यासंदर्भात २९ जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही वटहुकूम घटनाबाह्य घोषित करण्यात यावेत व व्यवस्थापन परिषदेची निवडणूक जुन्या कायद्यानुसार घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. अश्फाक शेख यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठ