शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १५ हजार फेरीवाल्यांपुढे उदरनिर्वाहाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 23:37 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प : साहित्य पुरवणाऱ्या लघु उद्योजकांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. नागपूर शहरातील १५ हजार फेरीवाले व त्यांना साहित्य पुरविणारी लघु उद्योजक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक व रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करून फेरीवाले आपला उदरनिर्वाह करतात. यात सीताबर्डी, महाल, मध्यवर्ती बसस्थानक, इतवारी, मस्कासाथ, शहीद चौक, गांधीबाग, दहीबाजार, खामला, सदर, आशीर्वादनगर, दिघोरी, जिल्हा मुख्यालय, जरीपटका मार्केट, गोकूळपेठ, रामनगर, सेमिनरी हिल्स, एमआयडीसी, सक्करदरा यासह शहराच्या विविध भागात १२ ते १५ हजार फेरीवाले व्यवसाय करतात. ते लघु उद्योजक (गारमेंट) यांच्याकडून माल घेतला आणि विक्री करतात. फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने कपडे व अन्य साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कुटुंंबांवरही असेच आर्थिक संकट आले आहे. व्यवसायासाठी जमा असलेल्या पुंजीतून कसाबसा दीड महिना काढला. परंतु जवळ होते ते संपले, आता करायचे काय? असा प्रश्न फेरीवाले व गारमेंट व्यवसायिकांना पडला आहे. २१ मार्च पासून राज्य सरकारने व त्यानंतर २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊ न लागू केले. त्यानंतर देशात पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊ न वाढविण्यात आले आहे. नागपूर शहरात जवळपास १५ हजार फेरीवाले असून त्यांना साहित्य पुरवणारे तीन ते चार हजार कुटुंबे लघु युनिट चालवून मालाचा पुरवठा करतात. व्यवसाय ठप्प असल्याने १८ हजार कु टुंबांपुढे आर्थिक संकट उभे ठाकल्याची माहिती फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. फेरीवाले व त्यांना माल पुरविणाऱ्यांची दररोज ४ ते ५ कोटींची उलाढाल होते. हातावरची कमाई असल्याने उदरनिर्वाहाचे हेच त्यांचे साधन आहे. या व्यावसायिकांंना वेळीच मदत मिळाली नाही तर ते गंभीर संकटातून बाहेर पडणार नाहीत.गारमेंट व्यवसाय सावरण्याला सहा महिने लागतीलफेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने गारमेंट व्यवसायही ठप्प आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते फेडण्याची चिंता लागली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही यातून सावरण्यासाठी गारमेंट व्यवसायाला किमान सहा महिने लागतील, अशी माहिती गारमेंट व्यावसायिकांनी दिली.संघटनेकडून प्रत्येकी दोन हजारांची मदतव्यवसाय दीड महिन्यापासून ठप्प असल्याने फेरवाल्यांपुढे उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. याचा विचार करता नागपूर फेरीवाला संघटेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना प्रत्येकी दोन हजारांची आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रज्जाक कुरैशी यांनी दिली. यासाठी संघटनेचे पदाधिकारी गोपी अंभोरे, शेख शाहिद, संदीप साहू, राजू मिश्रा, कालू मिश्रा आदींनी पुढाकार घेतला आहे. आर्थिक संकटातील फेरीवाल्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुरैशी यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर