शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२२७ कामगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 21:12 IST

मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय मिल मजूदर संघ मोर्चाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे शासनाने हा विभाग बंद करण्याची परवानगी देऊ नये, या मागणीला घेऊन राष्ट्रीय मिल मजूदर संघाच्यावतीने (इंटक) सोमवारी विधिमंडळावर मोर्चा काढून जोरदार नारेबाजी केली.या मोर्चात सहभागी झालेले प्रवीण चौधरी म्हणाले, या कंपनीमध्ये ६५० कामगार आहेत. कंपनीचा प्रोसेस विभाग बंद पाडल्याने २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. या कामगारांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे. यामुळे इतरत्र त्यांना नोकरी मिळणे कठीण आहे. यामुळे शासनाने यात लक्ष घालून कामगारांचे हक्क मिळवून देणे आवश्यक आहे. कापड खात्यातील २४९ कामगारांच्या प्रश्नावर मजदूर संघ व व्यवस्थापनाने बसून योग्य तोडगा काढावा, असे निर्देशही शासनाने द्यावे, असेही ते म्हणाले.नेतृत्वमोर्चाेच नेतृत्व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, आफताब खान यांनी केले. शिष्टमंडळात तिमांडे, खान यांच्यासह प्रवीण चौधरी, उज्ज्वला भगत, रुपाली धोटे आदींचा सहभाग होता.मागण्या

  • २२७ बेरोजगार कामगारांचा प्रश्न शासनाने सोडवावा.
  • अप्पर कामगार आयुक्तांनी कंपनीला विभाग बंद करण्याची परवानगी देऊ नये
  • कामगारांना कायदेशीर हक्क शासनाने मिळवून द्यावे

२६ एकर जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवा 

भंडारा जिल्ह्यातील ग्रा. पं. राजेगाव हद्दीतील चिखली-हमेशा येथील २६ एकर सरकारी जागेवर गेल्या ३७ वर्षांपासून गडेगाव (भंडारा) येथील अशोक लेलँड कंपनी लि.ने अतिक्रमण केले आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी व अतिक्रमण तातडीने हटवावे, या मागणीसाठी राजेगाव (एमआयडीसी) ग्रामवासीयांनी विधिमंडळावर मोर्चा काढून लक्ष वेधले. मोर्चाचे नेतृत्व अचल मेश्राम, कुंजन शेंडे, शशी भोयर, अनिता शेंडे, शालिक गभाने, देवराव वासनिक आदींनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन