शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंंबई-नागपूर बुलेट ट्रेन विचाराधीन, आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:15 IST

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

नागपूर : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.रेल्वे मंत्रालयाने स्पॅनिश कंपनीची मुंबई-नागपूर जलदगती रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्ती केली आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र राज्य सरकारला केंद्र शासनाकडून याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, संजय दत्त आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

दुधाला हमीभाव मिळण्यासाठी कायदा करणारनागपूर : राज्यातील दूध उत्पादन करणा-या शेतक-यांचे हित जोपासण्यासाठी शुगर प्राईज कंट्रोल अ‍ॅक्टच्या धर्तीवर दुधाकरिता कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील दूध उत्पादन करणा-या शेतक-यांना दूध उत्पादक संस्थांकडून दुधाला वेगवेगळे दर दिले जातात. शासनाने निश्चित केलेले दूध खरेदी दर हे शासन व सहकार क्षेत्राकरिता लागू आहेत. मात्र खासगी क्षेत्राच्या दूध खरेदी व विक्री दरावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी दूध क्षेत्राकडून दूध उत्पादक शेतकºयांना बाजारभावाप्रमाणे दर दिले जातात, अशी माहिती जानकर यांनी दिली.परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १५०० बसेसनागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास १५३ शिवशाही वातानुकूलित बसेस प्राप्त झालेल्या आहेत. लवकरच १५०० बसेस भाडेतत्त्वावर प्राप्त होतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. अनंत गाडगीळ यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.पहिल्या टप्प्यात ७०० बसेसचा पुरवठा करण्यासाठी सात निविदाकारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाने स्वमालकीच्या ५०० बसेस घेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. परिवहन महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने शिवशाही बसेस दाखल होत असल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७