शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणाला सुरुवात : ४० हजारावर कर्मचाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 09:53 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या प्रशिक्षणात तब्बल ४० हजारावर कर्मचारी सहभागी झाले असून ते निवडणूक प्रक्रिया समजावून घेत आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या प्रशिक्षणात तब्बल ४० हजारावर कर्मचारी सहभागी झाले असून ते निवडणूक प्रक्रिया समजावून घेत आहेत.उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, निवडणुकीच्या कामासाठी असलेल्या सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत असते. ते विविध स्तरावर सुरू आहे. प्रत्यक्ष बुथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू झाले आहे. नागपूर लोकसभा मतदार संघांतर्गत येणारे नागपूर दक्षिण-पश्चिम, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पश्चिम नागपूर अशा सर्व विधानसभा आणि रामटेक लोकसभा मतदार संघातील कामठी आणि हिंगणा या विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू झाले आहे. दोन पाळीत हे प्रशिक्षण घेतले जात आहेत. मास्टर्स ट्रेनर त्यांना प्रशिक्षण देत आहेत. येथे तब्बल ३२ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील सावनेर, उमरेड, रामटेक आणि काटोल येथील विधानसभा मतदारसंघनिहाय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होत आहे. येथे १२ हजाराच्या जवळपास कर्मचारी सहभागी झाले आहेत. २२ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण चालेल.

व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिकया निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा पहिल्यांदाच वापर होत आहे. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट हाताळण्याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी सुरेश भट सभागृहात २४ मशीनद्वारे प्रात्यक्षिक सुद्धा केले जात आहे.

२२ नंतर दुसरे प्रशिक्षणनिवडणुकीच्या कामात असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण होत असते. २२ तारखेपर्यंत हे प्रशिक्षण चालेल. त्यानंतर पुन्हा दुसरे प्रशिक्षण होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक