पहिला दिवस मजेचा : शाळेत रमले चिमुकले!उन्हाळ्याच्या सुट्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी मुलांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. धो धो बरसणारा पाऊसही शाळेत येण्यापासून मुलांना रोखू शकला नाही. सकाळी शाळेत जाण्यासाठी मुलांची लगबग सुरू होती. ‘बाबा बस्ता..., आई डबा..., माझे नवे बूट कुठे आहेत?’ अशी मुलांची ओरड अनेक घरात सुरू होती. मुलांची तयारी करण्यासाठी पालकांचीही धावपळ सुरू होती. गणवेश चढव..., बूट घाल..., असे म्हणत पालकांनी मुलांची तयारी करून दिली. पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांची रडतानाच तयारी करून देण्यात आली. धावाधाव करीत आॅटो, बसमध्ये किंवा शाळेपर्यंत मुलांना सोडून देताना पालकांची तारांबळ उडाली होती.
शाळा सुरू, नवे मित्र करू !
By admin | Updated: June 28, 2017 02:42 IST