शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाला सुरुवात करा

By admin | Updated: October 18, 2016 02:50 IST

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी वर्धा मार्गावरील आॅरेंज सिटी स्ट्रीट आणि मेट्रो रेल्वे या दोन्ही प्रकल्पांच्या

फडणवीस-गडकरी यांची सूचना : मेट्रोला जोडण्याच्या प्रस्तावावर फे रविचार नागपूर : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी वर्धा मार्गावरील आॅरेंज सिटी स्ट्रीट आणि मेट्रो रेल्वे या दोन्ही प्रकल्पांच्या आर्थिक सक्षमतेच्या मुद्यावर अधिक अभ्यास क रा. तांत्रिक अडचणी दूर करून आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाच्या कामाला तातडीने सुरु वात करा, अशा सूचना रविवारी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या गडकरी वाड्यावरील बैठकीत देण्यात आल्या. हॉटेल रेडिसन ब्ल्यू चौकापासून थेट जयताळा-हिंगणा मार्गापर्यंत जागतिक दर्जाचा गृह प्रकल्प (आॅरेंज सिटी स्ट्रीट)तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. याचा आराखडा तयार करण्याचे काम हफिज कॉन्ट्रॅक्टर यांना देण्यात आलेले आहे. वर्धा मार्गावर सध्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. तिचा विस्तार हिंगण्यापर्यंत करून ती आॅरेंज सिटी स्ट्रीटमधून वळविण्याच्या सूचना गडकरी यांनी मेट्रो रेल्वे कोर्पोरेशनला केली होती. त्यामुळे आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाला महत्त्व येईल. तसेच मेट्रोलाही प्रवासी मिळतील त्याचप्रमाणे बर्डीवरून हिंगण्याला जाण्याऐवजी वर्धा मार्गावरून हिंगण्याला जाण्याचा दुसरा पर्याय नागरिकांना उपलब्ध होईल. दोन्ही प्रकल्पांना आर्थिक सक्षमता मिळेल असा अंदाज आहे. बैठकीत आॅरेंज सिटी स्ट्रीटचे सादरीकरण करण्यात आले. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कसा होईल, हा प्रकल्प मेट्रोला जोडल्यास काय फायदे होतील, मेट्रो आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल की, यावर फेरविचार करावा लागेल. यावर चर्चा करण्यात आली. मेट्रो उभारण्याचा खर्च प्रचंड असल्याने त्याऐवजी मोनो अथवा स्मॉल ट्रेन या पर्यायाचा अभ्यास करून खर्च कमी असेल तो पर्याय निवडावा, अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. (प्रतिनिधी) ३५०० कोटींचा प्रकल्प आॅरेंज सिटी स्ट्रीट मौजा सोमलवाडा, खामला, जयताळा येथील ३२. ४८ हेक्टर जागेवर आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. येथे निवासी, व्यावसायिक गाळे, रुग्णालय, बाजार, दुर्बल घटकांकरिता गाळे व इतर विकास कामे प्रस्तावित आहे. प्रस्तावित प्रकल्प ३५०० कोटींचा आहे. प्रकल्पाला लवकरच सुरुवात आॅरेंज सिटी स्ट्रीट हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शहराच्या विकासाला गती मिळेल. - प्रवीण दटके, महापौर