लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : दाेन वर्षांपूर्वी माैदा येथे आधार केंद्र सुरू करण्यात आले. परंतु नागरिकांची असुविधा लक्षात घेता तहसील कार्यालयाच्या सेतू कक्षात दुसरे आधार केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे पूर्वीचे केंद्र बंदच्या स्थितीत असून, एकाच केंद्रावर अधिक गर्दी हाेत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागताे. यामुळे माैदा येथे नवीन आधार केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे यांच्याकडे निवेदन साेपविले आहे.
माैदा येथील आधार केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी हाेते. येथे ५० चा आकडा पूर्ण हाेताच नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. या ठिकाणी नाव नाेंदणी करून नवीन आधार काढणे, आवश्यक फेरबदल करणे ही कामे केली जातात. यात नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, वेळही वाया जाताे. शिवाय, एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे माैदा येथे नवीन आधार केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र पिंगळे, सूर्यभान सपाटे, सुभाष सारवे, भाऊराव मारबते, संदीप बांडाने, विनोद कावळे, श्याम कुंभरे, अजय वैद्य, भगवान पिकलमुंडे, देविदास कुंभलकर, सुधाकर झलके, प्रभाकर वाढिवे, सतीश भोयर, मंगेश भागलकर, फिरोज खान, अजय मते, तुकाराम लुटे आदी उपस्थित होते.