शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरवरून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:43 IST

नागपूरसह विदर्भातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपुरातून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा, अशी मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली.

ठळक मुद्दे‘डीआरयुसीसी’ सदस्यांची मागणी : रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपुरातून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा, अशी मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गुरुवारी सदस्यांच्या सुचना ऐकण्यासाठी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या १५४ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार होते. बैठकीत सदस्यांनी नागपूर ते रायबरेली व्हाया कानपूर मार्गे रेल्वेगाडी सुरु करावी, नागपूर-रतलाम, मुंबई व गोंदियाला जाणाºया गाड्यांना अजनी रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा, नागपूर ते वर्धा, चंद्रपूर, भंडारा, काटोल, आमला, अमरावतीसाठी फास्ट पॅसेंजर गाडी सुरु करावी, नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेसला दररोज चालवावे, गोधणी रेल्वेस्थानकाचा विस्तार करावा, जयपूरसाठी स्पेशल रेल्वेगाडी सुरु करावी तसेच रेल्वेगाड्यात जनरल कोचची संख्या वाढवावी आदी मागण्या केल्या. बैठकीला रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य डॉ. तुळशीराम मार्लावार, संजय धर्माधिकारी, दिलीप सांबरे, महेश लोखंडे, बाबूसिंह गहेरवार, गणेश उगे, कांतिलाल लुनावत, वसंत पालीवाल, गांगेय सराफ, सतीश काले, निलेश खरबडे, अजय दुबे आणि झोनल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य बसंत कुमार शुक्ला उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाrailwayरेल्वे