शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा; संत गजानन महाराज संस्थानला हायकोर्टाचे आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 28, 2022 18:30 IST

विकास कामांमध्ये कोणी अडथळा आणू नये याकरिता बुलडाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संस्थानला योग्य सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले.

नागपूर : देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र शेगाव येथील मातंगवाडी परिसरामध्ये वादग्रस्त जमीन वगळून इतर जमिनीवर मंजूर आराखड्यानुसार विकास कामे सुरू करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संत गजानन महाराज संस्थानला दिला.

विकास कामे सहा महिन्यात पूर्ण करा. विकास कामांमध्ये कोणी अडथळा आणू नये याकरिता बुलडाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संस्थानला योग्य सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले. या परिसरातील १५ हजार चौरस फूट जमिनीच्या संपादनाविरुद्ध दहा जनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या जमिनीसंदर्भात येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत यथास्थिती ठेवण्याचा आदेश आहे. त्यामुळे विकास कामे करताना ही जमीन वगळायची आहे. न्यायालयाने आता ही याचिका शेगाव विकासाच्या याचिकेसोबत जोडून घेतली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ॲड. फिरदौस मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, संस्थानतर्फे ॲड. अरुण पाटील यांनी कामकाज पाहिले.

मुख्याधिकाऱ्यांची प्रशंसा 

खळवाडी व मातंगवाडी येथील अतिक्रमण गेल्या अनेक महिन्यांपासून हटवले गेले नव्हते. त्यामुळे दोन्ही जमिनीचा ताबा संस्थानला मिळाला नव्हता. परिणामी, गेल्या तारखेला न्यायालयाने दोन आठवड्यात अतिक्रमन हटविण्याचा आदेश नगर परिषदेला दिला होता, तसेच आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास मुख्याधिकाऱ्यांनी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असे नमूद केले होते. दरम्यान, मुख्याधिकारी जयश्री बोराडे यांनी तातडीने अतिक्रमण हटविले. त्याकरिता, न्यायालयाने त्यांची प्रशंसा केली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरShegaonशेगाव