शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

स्टारबसचे स्टेअरि ंग कुणाच्या हातात ?

By admin | Updated: August 24, 2015 02:26 IST

शहरातील ‘स्टारबस’बाबत नेहमीच काही ना काही ओरड सुरू असते. बसेसची योग्य देखभाल होत नसल्याने एकेक बस जीर्ण होत चालली असून ....

चालकाचा परवाना अपडेट नाही : अपघात विम्याच्या दाव्याद्वारे उघडकीस आला प्रकार लोकमत विशेषआनंद डेकाटे  नागपूरशहरातील ‘स्टारबस’बाबत नेहमीच काही ना काही ओरड सुरू असते. बसेसची योग्य देखभाल होत नसल्याने एकेक बस जीर्ण होत चालली असून या बससेवेमुळे नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्रासच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता ‘एक्सपायरी डेट’ परवानाचालक स्टारबस चालवित असल्याचे धक्कादायक प्रकरण अपघात विम्याच्या दाव्याद्वारे उघडकीस आले आहे. वायुसेना नगर क्वॉर्टर येथे राहणारी रवीना सुरेशराव भाजीपाले ही १८ वर्षीय तरुणी एलएडी कॉलेज शंकरनगर येथे बीए प्रथम वर्षाला शिकत होती. १२ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कॉलेज आटोपून घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत शंकरनगर चौकात उभी होती. दरम्यान एम.एच. ३१- सीए-६०८२ या क्रमांकाची स्टारबस आली. रवीना बसमध्ये चढली. बसमध्ये अतिशय गर्दी असल्याने रवीना बसच्या दरवाजाजवळच उभी होती. बसचालक बस भरधाव चालवित होता. ३.१५ वाजताच्या दरम्यान रविनगरकडे जात असताना स्टारबसचा चालक विलास मकेश्वर याने अतिशय निष्काळजीपणे जोरात ब्रेक लावले. त्यामुळे रवीना बसच्या दरवाजातून बाहेर फेकल्या गेली. ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला चांगलाच मार बसला. बसमधील प्रवाशांनी चालकाला जाब विचारा. परंतु चालक अतिशय असभ्यपणे वागला. आपली काही चूक नाही, असे सांगून रवीनाला जखमी अवस्थेत सोडून मदत न करता निघून गेला. रस्त्यावरील काही लोकांच्या मदतीने रवीनाला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. रवीनाचा भाऊ अश्वीन याने यासंदर्भात तक्रार दाखल केली. अंबाझरी पोलीस ठाण्यात महानगरपालिकेचा वाहतूक विभाग, वाहतूक अभियंता आणि द न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी लि. यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात आले. यसंदर्भात विमा कंपनीने आपल्या वकिलामार्फत या प्रकरणाची सत्यता पडताळून घेण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी या प्रकरणाची आपल्या स्तरावर चौकशी सुरू केली. एकेक कागदपत्र ते गोळा करीत होते. याअंतर्गत ते बसचालकालाही भेटले. कागदोपत्री कारवाईसाठी त्यांनी त्याला बसचालकाचा परवाना मागितला. परंतु त्याने परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली. तब्ब्ल सहा महिने प्रयत्न करूनही परवाना मिळत नसल्याने मेश्राम यांनी प्रादेशिक वाहतूक विभागातून चालकाच्या परवानासंबधीची माहिती काढली. तेव्हा चालक मकेश्वर याचे ड्रायव्हिंग लायसन्स ८८/७०६१/नाग हे २३ एप्रिल १९८८ रोजी वितरित करण्यात आले होते. त्या परवान्याची मुदत ८ जुलै २००८ रोजी संपली. तेव्हापासून परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. परवाना लॅप्स झाला आहे. यासंदर्भात त्यांनी विमा कंपनीला आपला अहवाल सादर केला आहे.