शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

स्टार होणार ‘ई-बस’

By admin | Updated: September 11, 2015 03:14 IST

देशातील इंधनाची वाढती मागणी आणि प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रीक बॅटरी बसला मंजुरी दिली आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची मंजुरी : प्रायोगिक स्तरावर बॅटरीवर धावणार बससुमेध वाघमारे नागपूरदेशातील इंधनाची वाढती मागणी आणि प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रीक बॅटरी बसला मंजुरी दिली आहे. या पत्राच्या आधारे शहर आरटीओ कार्यालयाने गुरुवारी वंश निमयाच्या एका बसच्या इंजिनमध्ये फेरबदल (मॉडिफिकेशन) करण्यासाठी मुंबईच्या एका कंपनीला तात्पुरती हस्तांतरीत करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे नजीकच्या काळात डिझेल इंधनाला बगल देत नागपुरात बॅटरीवर बसेस धावताना दिसणार आहे.स्टार बसचा कारभार सध्या डबघाईला आला आहे. यातच तोकड्या बसेस, आवश्यक सोयींचा अभाव व ८ कोटी २० लाखांचा प्रवासी कर आजही थकीत असल्याने या बसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यावर बॅटरीवर धावणाऱ्या ‘ई-बसेस’ दर्जेदार बस सेवा पुरविण्यास सक्षम ठरण्याची शक्यता आहे. सध्या बंगळुरू शहरात अशी बस धावत असून आता नागपुरातही या बसेससाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मे. सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने या संदर्भात मंजुरी मिळण्यासाठी सर्वप्रथम प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरला प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांच्या अधिकारात ही बाब येत नसल्याने त्यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, (एमओआरटीएच) दिल्लीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमओआरटीएचने मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ५२ व ११० (३) नुसार विद्युत संचलित बस करण्यासाठी प्रायोगिक स्तरावर काही अटी व शर्तीच्या अधीन राहून परवाना दिला. तसे पत्र राज्याच्या परिवहन आयुक्तांना पाठविण्यात आले. आयुक्तांनी या संदर्भातील निर्देश शहर आरटीओला दिले. स्टार बस होणार ‘ई-बस’गुरुवारी आरटीओ, शहर कार्यालयाने वंश निमयाची एम.एच.३१ सीए ५२०० या क्रमांकाच्या मिनी स्टार बसला बॅटरी संचालित करावयासाठी गोरेगाव मुंबई येथील मे. सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडला तात्पुरते हस्तांतरीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता या बसचे इंजिन काढून त्यांना विद्युत संचालित केले जाईल. या बदलांमुळे स्टार बस आता ‘ई-बस’ होणार आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि इंधनाच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेत अशी वाहने आल्यास याचा फायदा प्रवाशांसह शासनालाही होणार आहे. परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार गुरुवारी अशाच एका वाहनाचे मॉडिफिकेशन करण्यासाठी बस हस्तांतरणाला मंजुरी देण्यात आली आहे.-विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ, शहर.