शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात होणार राहणीमान सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 11:30 IST

नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१ ते २९ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रियानागरिकांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी केले आहे.नागपूर शहरात १ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान सर्वेक्षण सुरू राहील. या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये राहण्यास योग्य शहर,महापालिकेचे कामकाज, शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात देशातील ११४ शहरे सहभागी होत आहेत.महाराष्ट्रातील १२ शहरे सर्वेक्षणात सहभागी होत आहेत. आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल मानांकन प्राप्त व्हावे, याकरिता नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केंद्र्र शासनाने निश्चित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. राहणीमान सर्वेक्षणाव्दारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे प्रशासनास, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे.

लिंक/क्यूआर कोडव्दारे सहभाग नोंदवासहा महिन्यापेक्षा जास्त काळ नागपूर शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने राहणीमान सर्वेक्षण २०१९ चा क्यूआर कोड स्कॅन करुन या सर्वेक्षणात सहभाग घ्यावा. सर्वप्रथम eol2019.org/citizenfeedback या संके त स्थळावर जाऊन किं वा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर नागपूर शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे असे रामनाथ सोनवणे यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार